भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला मोठा झटका, पाकिस्तानात प्रचंड मोठा पराभव

भारताचा शत्रू आणि 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या PMML पक्षाला पाकिस्तानातील गुजरांवाला पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी PML-N ने सईद समर्थित उमेदवाराचा पराभव केला. हा सईदसाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे. यापूर्वी 2024 च्या निवडणुकीतही PMML ला यश मिळाले नव्हते, ज्यामुळे दहशतवादी सईदचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.

भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला मोठा झटका, पाकिस्तानात प्रचंड मोठा पराभव
Hafiz Saeed
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 11:23 PM

भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे. दहशतवादी हाफिज सईदच्या पक्षाचा पाकिस्तानात झालेल्या संसदीय पोटनिवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला (NA-77) जागेवर पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) पक्षाने हाफिज सईद समर्थित उमेदवाराचा पराभव केला आहे. हा हाफिज सईदसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे. हाफिज सईदची पॉलिटिकल ब्रँच ‘पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग’ (PMML)चा उमेदवार मोहम्मद इब्राहिम गुर्जरला 30,000 हजार मते मिळाली. तर PML-Nचा उमेदवार राशिद बशीर विर्कने 43,000 हून अधिक मते मिळवून विजय मिळवला आहे. ही सीट खासदार महमूद बशीर विर्क यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या निवडणुकीत इमरान खान यांच्या पीटीआय, पाकिस्तान पीपुल्स पर्टी आणि जमात ए इस्लामने एकही उमेदवार दिला नव्हता.

Loading...

निवडणुकीवर बहिष्कार

पाकिस्तानमध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीत अत्यंत कमी टक्के मतदान झालं. या निवडणुकीत एका गावातील लोकांनी या निवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता. या गावातून एकही मत पडलं नाही. निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या पाच महिला खासदारांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. पराभवानंतर PMML ने निकाल अमान्य केला असून सत्ताधारी PML-N वर मोठ्या प्रमाणात गडबड केल्याचे आरोप केले आहेत.

PMML ने 2024 च्या सर्वसाधारण निवडणुकीत नशीब अजमावलं होतं. त्यावेळीही त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. लश्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा संस्थापक हाफिज सईदची ही नवी राजकीय संघटना पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनासाठी काम करत असते.

हाफिज सईद हा बंदी घातलेल्या लश्कर ए तोयबा आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनांचा संस्थापक आहे. मुंबईवर 2008मध्ये झालेल्या हल्ल्यात 166 निर्दोष व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद आहे. तो भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. असं असतानाही त्याने पाकिस्तानात मोठं नेटवर्क उभारलं असून पाकिस्तानच्या राजकारणात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us