India Chile Trade Deal : भारताचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक, अमेरिकेनंतर आता आणखी एका देशाशी मोठा करार; चीनची झोप उडाली!

भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करार झाला आहे. आता भारत आणखी एका महत्त्वाच्या देशासोबत करार करत आहे. यामुळे चीनला मोठा फटका बसणार आहे.

India Chile Trade Deal : भारताचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक, अमेरिकेनंतर आता आणखी एका देशाशी मोठा करार; चीनची झोप उडाली!
narendra modi and xi jinping
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 14, 2026 | 5:43 PM

India Chile Trade Deal : संपूर्ण जगात सध्या भारताची चर्चा सुरू आहे. भारताने अमेरिकेसोबत ऐतिहासिक असा अंतरिम व्यापार करार केला आहे. सोबतच भारताने युरोपीयन युनियनसोबतही असाच करार केला आहे. या करारांमुळे भारताचा अमेरिका आणि युरोपीयन देशांसोबत व्यापार वाढणार आहे. युरोपीयन युनियनसोबत झालेला हा करार ‘मदर ऑफ ऑल डिल्स’ असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता भारत आणखी एका देशाशी करार करत असून या करारामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. या देशाचे नाव चिली असून हा करार अस्तित्त्वात आल्यास भारताचे चीनवरील अवलंबित्त्व कमी होणार आहे.

नेमका काय करार होत आहे?

चिली हा देश दुर्मिळ खनिजांनी संपन्न आहे. चिली या देशात लिथीयम, कॉपर यासारख्या दुर्मिळ खनिजांचा साठ्या प्रमाणात आहे. सध्या जगभरात लिथीयमची मागणी वाढत आहे. तुम्ही वापरत असलेल्या फोनमध्येदेखील लिथिमयची बॅटरी असते. उर्जानिर्मितीत लिथियमची खूप गरज असते. सोबतच उद्योग क्षेत्रात कॉपर या धातूचीही मोठी मागणी असते. जगभरातील साधारण 23 टक्के कॉपर एकट्या चिली या देशातून निघतो, असे सांगितले जाते. त्यामुळे भारताचा चिली या देशासोबत हा करार अस्तित्त्वात आला तर भारताला त्याचा मोठा फायदा होईल. भारताचे चीनवरील अवलंबित्त्व कमी होईल.

चीनची एकाधिकारशाही कशी संपणार

आज एखाद्या देशाला प्रगती करायची असेल तर त्या देशाकडे फक्त पैसे असून चालत नाही. संबंधित देशाकडे संसाधनं, दुर्मिळ खनिजं असणेही गरजेचे आहे. खनिजंच नसतील तर उद्योग क्षेत्राची भरभराट अशक्य आहे. त्यातही दुर्मिळ खनिजांची मागणी वाढल्याने प्रत्येक देशाला ही दुर्मिळ खनिजं हवी आहेत. लिथियम, कोबाल्ट, कॉपर, रिनियम, मॉलिब्डीन यांचा दुर्मिळ आणि महत्त्वाच्या खनिजांत समावेश होतो. चीन हा देश अशा खनिजांमध्ये संपन्न आहे. याचाच फायदा घेऊन चीनने जगभरातील देशांवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताच्या पुरवठ्यातही चीनने खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु चिली या देशासोबत करार झाल्यास भारताला चीनची गरज कमी पडेल. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.