भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, मोठा हाहाकार, मार्ग काढणे कठीणच, रशियाच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात भारताला मोठा दणका बसताना दिसत आहे. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच भारतासाठी अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. भारताला ज्याची प्रचंड भीती होती, तेच अखेर घडल्याचे बघायला मिळत आहे.

भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, मोठा हाहाकार, मार्ग काढणे कठीणच, रशियाच्या..
Vladimir Putin
| Updated on: May 17, 2026 | 11:48 AM

होर्मुज खाडीत संकट आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर इराण आणि अमेरिका युद्धाचा गंभीर परिणाम होत आहे. केंद्र सरकार गेल्या आठ दिवसांपासून या काळात मोठे पाऊले उचलत आहे. ऊर्जेचे गंभीर संकट असताना भारताकरिता एक अत्यंत वाईट बातमी पुढे आली होती. इराण आणि अमेरिका युद्धात भारताला हवे तेवढे तेल रशियाकडून दिले जात होते. जगातील इतर देशात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. रशिया भारताच्या मदतीला आल्याने भारताला फार काही परिणाम या काळात जाणवला नाही. तुटवडा कच्च्या तेलाचा भारतातही आहे. पण रशियामुळे भारताला झळ बसली नाही. इराण युद्धात तेलाच्या किमती वाढू नये, आणि तेल तुटवडा कमी करण्याकरिता अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध काही काळाकरिता हटवले. 16 मे 2026 रोजी रशियाच्या तेलावरील हटवलेले निर्बंध संपले. त्यानंतर अमेरिका पुन्हा रशियाच्या तेलावरील निर्बंध पुढे ढकलेल असे सांगितले जात होते.

भारताने जागतिक पातळीवर त्याकरिता प्रयत्नही सुरू केले. भारतासह अनेक देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतात. अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवले नाही तर मोठी समस्या निर्माण होईल. मात्र, अनेक देशांनी रशियाच्या तेलावरील निर्बंधांकरिता पुढील काही दिवस स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र, अमेरिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे भारतापुढे मोठी समस्या आहे.

आता तेल कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण झाला. कालच पुन्हा रशियाच्या तेलावर निर्बंध पुन्हा लागू करण्यात आली. अमेरिकेच्या निर्णयाचा स्पष्ट अर्थ असा आहे की, रशियाकडून तेल खरेदी करण्यामध्ये काही देशांना मिळत असलेली मर्यादित सवलत आता संपुष्टात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने मार्च आणि एप्रिलमध्ये दोनदा ही सूट दिली होती, परंतु ती केवळ रशियन तेलाने आधीच भरलेल्या टँकर्सनाच लागू होती. यापूर्वी अमेरिकेने रशियाच्या तेलावर सूट दिली होती, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

युरोपियन देशांचे म्हणणे आहे की, रशियाच्या तेलावरील निर्बंध कायम राहायला हवीत. युक्रेन विरोधात युद्ध लढण्याकरिता त्यांना पैसा मिळाला नाही पाहिजे. भारत, इंडोनेशिया यासारख्या देशांनी रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवण्याची मागणी केली. कारण होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. मात्र, अमेरिकेने रशियाच्या तेलावर सूट देण्यास मनाई केल्याचे कळत आहे. दुसरीकडे युक्रेनने रशियाच्या तेल रिफायनरीवर अत्यंत मोठा हल्ला केला. ज्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या हल्ल्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरीला मोठी आग लागल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us