
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले आहेत. अमेरिकेकडून सातत्याने भारताला धमक्या दिल्या जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही थेट भारतावर टीका केलीये. भारत हा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेला जुमानत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा तळफळाट उडला आहे. हेच नाही तर यादरम्यान भारताची अनेक इतर देशांसोबत जवळीकता वाढलीये. भारताने काही दिवसांपूर्वी चीनसोबत मोठा करार केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला. आता परत एकदा अमेरिकेकडून भारताला धमकी देण्यात आलीये.
काहीही झाले तरीही 27 ऑगस्टपासून भारतावर टॅरिफ लावला जाणार असल्याचे परत एकदा अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. भारताकडून टॅरिफ टाळण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अजूनही निर्णय झाला नाहीये. अमेरिकेची टॅरिफबद्दल वेगळी भूमिका बघायला मिळतंय. चीन आणि इतर देशांवर टॅरिफ लावला नाहीये. जगात सर्वात जास्त रशियाकडून तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, त्यांच्यावर टॅरिफ लावण्यात आले नाहीये. भारतावर टॅरिफ लावण्याचे कारण अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदी करण्याचे सांगण्यात आलंय.
संयुक्त राष्ट्र अमेरिकाच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी म्हटले की, जगातील दोन मजबूत आणि मोठ्या लोकतांत्रिक देशांच्यामध्ये सुरू असलेली अनेक वर्षांपासूनची मैत्री मतभेदांमध्ये पुढे जाण्याची ताकद आहे. त्यांनी पुढे म्हटले की, व्यापार वाद आणि रशिया तेल आयात या गोष्टींवर चर्चा अत्यंत आवश्यक आहे. पण जे काही टार्गेट आहे ते देखील तितकेच महत्वाचे आहे.
हेली यांनी स्पष्ट केले की, चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेला नक्कीच भारतासारख्या मित्राची गरज आहे. त्यांनी यापूर्वी इशारा देत म्हटले होते की, भारत आणि अमेरिकेचे संबंध अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहेत. हेली यांनी म्हटले की, भारत जसा जसा मजबूत होईल, तशी चीनची महत्वकांक्षा कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर समोरासमोर येईल चर्चा करायला हवी, असेही त्यांनी म्हटले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भारताने गांर्भियाने घ्यावे, नाही तर परिणांना सामोरे जावे लागेल..