
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचे नुकसान भरून काढण्यासाठी भारताकडून विविध प्रकारे प्रयत्न केली जात आहेत. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच मोठा करार होण्याचे संकेत दिली आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमध्ये भारताच्या मदतील कतार धावून आला. भारत-कतार व्यापार करार 2026 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होईल, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी हे करार महत्त्वाचे मानले जात आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर 70 टक्के अमेरिकेत होणारी निर्यात बंद झाली. दोन्ही देशांकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यापार चर्चा होत असल्याने चांगले संकेत आहेत.
नोव्हेंबरपर्यंत व्यापार करार होण्याचे संकेत
सुब्रह्मण्यम यांनी बोलताना पुढे म्हटले की, अमेरिकेच्या शुल्काचा ख्रिसमसपर्यंत कोणताही महत्त्वाचा परिणाम होणार नाही. दोन्ही देशांमध्ये यादरम्यान व्यापार करार झाले नाही तर कदाचित पुढील काळात आपल्याला फटका बसू शकतो. मुळात म्हणजे अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत व्यापार करार झाला तर कोणतीही समस्या येणार नाही. भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात नक्कीच चिंतेची बाब आहे.
कतार आणि भारताची वाढली जवळीक्ता
भारताने कतारसोबत मोठा व्यापार करार केल्याने तो एक वेगळा फायदा भारताला नक्कीच आला. अमेरिका आणि भारतात आज ना उद्या व्यापार करार निश्चितपणे होईल, कारण ती दोन्ही देशांची गरज आहे. थोडक्यात काय तर भारताचा डबल फायदा होईल. दोन्ही देशांसोबत महत्वाचे व्यापार करार होतील. कतारने भारतासाठी त्यांची मोठी बाजारपेठ दिलीये. ज्यामधून भारत मो्ठ्या प्रमाणात पैसे कमावू शकतो.
द्विपक्षीय व्यापार 14.15 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त
गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मध्ये कतार हा भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. 2024-25 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 14.15 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाला. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. भारताने सध्याच्या परिस्थितीवर अमेरिकेपेक्षा जास्त कतारवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात देखील अजून काही महत्वाचे करार कतारसोबत केली जाऊ शकतात.