AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट काढली न्यायाधिशांची लाज, देशात भडका, थेट…

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगाला धमकावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सतत वेगवेगळ्या धमक्या देत आहेत. आता चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर न्यायाधिश आल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी खळबळजनक विधान केले.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट काढली न्यायाधिशांची लाज, देशात भडका, थेट...
Donald Trump
| Updated on: Oct 07, 2025 | 8:14 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयाविरोधात लोक स्पष्टपणे बोलत आहेत. काही देशांनी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट मोठे भाष्य केले. फेडरल न्यायाधीश करिन इमर्गट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय रद्द करत पोर्टलँडमध्ये सैन्य तैनात करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलाच थयथयाट करताना दिसत आहेत. त्यांनी थेट न्यायाधीश करिन इमर्गटबद्दल धक्कादायक विधान केले. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे करिन इमर्गटची नियुक्ती संघीय न्यायाधीशपदी ट्रम्प यांनीच केली होती. मात्र, ट्रम्प यांच्या विरोधात इमर्गटने निर्णय घेतल्याने त्यांचा संताप बघायला मिळाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट बंडखोरी कायदा लागू करण्याची धमकी देऊन टाकलीये. अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश करिन इमर्गट यांनी आदेश दिला की, ट्रम्प ओरेगॉनमधील पोर्टलँडमधील इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट केंद्राबाहेरील निषेध नियंत्रित करण्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करू शकत नाहीत. हा निर्णय ऐकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी थेट न्यायाधीश करिन इमर्गट यांच्याबद्दल हैराण करणारे विधान केले.

ट्रम्प प्रशासनाने म्हटले की, पोर्टलँडमधील निदर्शने हिंसक दंगलीत रूपांतरित होत आहेत आणि त्यांना शांत करण्यासाठी संघीय सैन्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे ओरेगॉन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, परिस्थिती राज्य पोलिस आणि स्थानिक कायदा अंमलबजावणीच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामध्येच ट्रम्प प्रशासनाला तिथे नॅशनल गार्ड तैनात करायचे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, न्यायाधीशांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी सोमवारी 1792 मध्ये मंजूर झालेल्या बंडखोरी कायद्याची अंमलबजावणी करू शकतात आणि राष्ट्रपतींना विशेष परिस्थितीत देशात सैन्य तैनात करण्याचा अधिकार आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायाधिशांची लाज काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प मोठा टॅरिफ लावत आहेत. मात्र, अमेरिकेत मोठा उद्रेक होताना दिसतोय.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.