AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, थेट टॅरिफबद्दलचा निर्णय बदलला, 1 नोव्हेंबरपासून 25 टक्के…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी टॅरिफची मोठी घोषणा करत थेट जगात खळबळ माजवली. प्रत्येक गोष्टीवर टॅरिफ लावण्याचे काम ट्रम्प करत आहेत. त्यामध्येच त्यांनी आता नुकताच एक मोठी घोषणा केलीये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, थेट टॅरिफबद्दलचा निर्णय बदलला, 1 नोव्हेंबरपासून 25 टक्के...
Donald Trump
| Updated on: Oct 07, 2025 | 7:32 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कशावर टॅरिफ लावतील, याचा नेम राहिला नाही. अमेरिकेच्या टॅरिफविरोधात अनेक देश मैदानात उतरताना दिसत आहेत. ब्राझीलने अमेरिकेला थेट मोठा इशारा दिला. हेच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आमचे आणि अमेरिकेचे आता कोणतेही संबंध राहिले नाहीत. भारत आणि ब्राझीलवर एकसोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावला. आता मध्यम आणि अवजड ट्रकवर तब्बल 25 ‘टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हा टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. अगोदर हा टॅरिफ 1 ऑक्टोबरपासूनच लागू होणार होता. मात्र, तो आता 1 नोव्हेंबरपासून लागू होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयावर अधिकारी आणि पुरवठादारांनी चिंता व्यक्त केल्याने त्याची मुदत पुढे ढकलण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली की, जड आणि मध्यम ट्रकवरील टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून लागेल. अमेरिकन उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल आपण उचलत असल्याचे त्यांनी म्हटले. आता याचा थेट परिणाम हा अमेरिकेत आयात होणाऱ्या ट्रक उत्पादनावर होईल. अनेक देश अमेरिकेमध्ये ट्रक आणि त्याचे पार्ट निर्यात करतात. मात्र, त्यामुळे अमेरिकेत बनणाऱ्या ट्रकची मागणी घटल्याचा दावा त्यांनी केला.

अमेरिकेतील व्यापाराला संधी देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकन उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.ट्रम्प यांनी सुरुवातीला असे म्हटले होते की, राष्ट्रीय सुरक्षेमुळेच आपण 1 ऑक्टोबरपासून जड ट्रक आयातीवरील कर लागू करतोय. आता त्यांनी त्यांचे विधान पूर्णपणे बदलले आहे.

टॅरिफ हा माझा सर्वात आवडतीचा शब्द असल्याचे काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. टॅरिफमुळे अगदी कमी काळात आपण श्रीमंत होऊ शकतो. अमेरिकेत यापूर्वी कधीही जितका पैसा आला नाही, त्यापेक्षा अधिक पैसा येत आहे. काही देश फक्त आपल्याकडून फायदा करून घ्यायचे आणि त्या बदल्यात आपल्याला काहीच देत नसत. अशांना हा मोठा धडा आहे.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....