आमची लक्ष्मण रेषा… भारताने पहिल्यांदाच थेट सुनावले अमेरिकेला, ट्रम्प यांच्या पुढे अजिबातच…
America Tariff : अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध सध्या तणावात आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील मागील काही दिवसांपासून बंद आहे. त्यामध्ये भारत आता अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरला आहे.

अनेक वर्षांपासून भारत आणि अमेरिकेत चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, टॅरिफच्या मुद्यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणल्याचे बघायला मिळाले. चीनच्या विरोधानंतरही भारताने अमेरिकेसोबतची मैत्री निभावली आहे. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यामध्ये अमेरिका भारताची मैत्री विसरली. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्यानंतर दोन्ही देणांमधील संबंध तणावात आहेत. फक्त हेच नाही तर जवळपास व्यापार चर्चा देखील बंद आहे. भारताने स्पष्ट म्हटले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान सहन करणार नाहीत. अमेरिका ही भारतासाठी मोठी बाजारपेठ कायमच राहिलीये. 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली. याचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर अमेरिकेवरही होत आहे.
विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी नुकताच भारत-अमेरिका संबंधांवर मोठे भाष्य केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारताने आपली लक्ष्मण रेषा ओढली आहे. त्यापुढे भारत जाणार नाही. भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम करणारे अनेक मुद्दे व्यापार करारावरापर्यंत पोहोचली आहेत. कोणताही करार अंतिम करताना भारताच्या लक्ष्मण रेखा यांचाही आदर केला पाहिजे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी व्यापारपेठ नक्कीच आहे.
द्विपक्षीय संबंधांचे काही गोष्टी चालू राहिल्याने दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होऊ शकला नाही. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचे मोठे नुकसान सध्या भारताला सहन करावे लागत आहे. काही क्षेत्रामधील नुकसान भरून काढण्यासाठी रशियाने पुढाकार घेतलाय. यासोबतच भारताने मुक्त व्यापार करार देखील काही देशांसोबत केली आहेत. भारताकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत.
यावेळी तरी काही मार्ग निघेल अशी अपेक्षा भारताला होती. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेवर अत्यंत मोठा टॅरिफ भारतावर लावला. यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध इतके जास्त ताणले गेले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा नियोजित अमेरिका दाैरा देखील रद्द केला. मात्र, गाझा पट्टीतील शांततेसाठी भारताने अमेरिकेला पाठिंबा दिला असून त्यांचे काैतुक देखील केले आहे.
