भारताने प्रथमच १२ अण्वस्रे तैनात केली, SIPRI ने ताज्या अहवालात केला दावा, चीन…
जगातील अण्वास्रांवर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था SIPRI ने तिच्या अहवालात धक्कादायक दावा केला आहे. भारताने पहिल्यांदा एकूण १२ अण्वस्रे डागता येण्याच्या स्थितीत रेडी टू युज अशी सज्ज ठेवली आहेत असे या संस्थेने म्हटले आहे.

एकीकडे भारत आणि पाकिस्तानात यांच्यातील वैर सर्वांना माहिती असतानाच आता जगातील शस्रास्रांवर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था SIPRI ने तिच्या अहवालात धक्कादायक दावा केला आहे. संस्थेने म्हटले आहे की भारताने १२ अण्वस्रे ऑपरेशनल म्हणजे संपूर्णपणे सुसज्ज स्थितीत ठेवली आहेत. याचा अर्थ भारतीय युद्धनौका, पाणबुड्या वा अन्य सैन्य प्लॅटफॉर्मवर काही अण्वस्रे वापरासाठी कायमस्वरुपी सज्ज ठेवली आहे. बातमीनुसार चीन आणि पाकिस्तान यांच्यापासून संभाव्य धोका पाहाता भारताने हे पाऊल उचलले आहे. रिपोर्टमध्ये हे देखील म्हटले आहे की भारताच्या विरोधात कोणताही देश हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर भारत लागलीच आण्विक कारवाई करण्याची क्षमता राखतो. हा दावा भारताच्या जुन्या आण्विक व्यवस्थेहून वेगळा आहे.
SIPRI च्या रिपोर्टनुसार भारताने आपल्या आण्विक तयारीत मोठा बदल केला आहे. आणि कमीत कमी १२ आण्विक शस्रे तैनात केली आहे. आधी असे मानले जात होते की भारत आपले आण्विक वॉरहेड आणि त्यांना वाहून नेणारी सिस्टीम उदा. मिसाईल यांना वेगवेगळे ठेवतो. मात्र, यंदा या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भारताने काही आण्विक वॉरहेडना त्यांच्या डिलिव्हरी सिस्टीमसोबत जोडले आहे किंवा त्यांना अशा सैन्य ठिकाणांवर ठेवले आहे, जेथे लागलीच वापरासाठी ते सज्ज राहील. असे पहिल्यांदा झाले आहे की भारताने आण्विक शस्रास्रांना ऑपरेशनल तैनातीच्या स्थितीत ठेवल्याचे SIPRIच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आधीच्या अहवालात भारताचे आण्विक शस्रास्रे केवळ स्टॉकपाईल म्हणजे साठाच्या रुपात दाखवली जात होती.
भारताकडे १९० अण्वस्रे
जानेवारी २०२६ पर्यंत भारताकडे एकूण १९० अणूबॉम्ब आहेत. यातील १२ आण्विक वॉरहेड मिसाईल, पाणबुड्या वा लढाऊ विमानासारख्या डिलिव्हरी सिस्टीमसोबत जोडण्यात आली आहेत. वा ऑपरेशनल फोर्सवाल्या ठिकाणांवर तैनात केली आहेत. याचा अर्थ आण्विक अस्रांना वेगळ्या स्टोरेजमध्ये ठेवण्याच्या भारताची अनेक दशकांच्या जुन्या व्यवस्थेत बदलाचे संकेत मिळाला आहे. अहवालात असे म्हटले आहे की आतापर्यंत असे म्हटले जात होते की शांततेचा काळात भारत आपल्या अण्वस्रांना ( वॉरहेड ) लाँचर पासून वेगळे राखतो. परंतू अलिकडच्या वर्षात मिसाईलना कॅनिस्टरमध्ये ठेवणे आणि समुद्रात गस्त वाढवण्यासारखी पावले हे संकेत देतात की भारत शांततेच्या काळातही काही आण्विक वॉरहेडना लाँचर सोबत ठेवण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
अहवालानुसार ऑगस्ट २०२४ पासून भारताने आण्विक मिसाईल घेऊन जाणाऱ्या दोन पाणबुड्या INS अरिघात आणि INS अरिदमन यांना ऑपरेशनल करण्यात आले आहे. दोन्ही पाणबुड्या आण्विक मिसाईल डागण्यास सक्षम आहेत. आणि त्यांना डेटरेन्स पेट्रोल म्हणजे सुरक्षा आणि प्रत्युत्तर क्षमता दाखवणारी गस्त दाखवण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. आण्विक मिसाईलने सुसज्ज असलेल्या पाणबुड्यांना लांबपल्ल्याच्या गस्तीसाठी पाठवले जाते. ज्या अनेक महिने समुद्रात राहू शकतात. या दरम्यान त्या सैन्य नेतृत्वाशी वेळोवेळो संपर्कात असतात. भारताची “नो फर्स्ट यूज” च्या धोरणाला पाहाता या पाणबुड्यांचा मुख्य उद्देश्य कोणत्या आण्विक हल्ल्याला तातडीने उत्तर देण्यासाठी आहे.
कोणत्या देशाचा अण्वस्रांवर खर्च किती ?
| अमेरिका | 69.2 अब्ज डॉलर |
|---|---|
| चीन | 13.5 अब्ज डॉलर |
| यूनायटेड किंगडम | 12.6 अब्ज डॉलर |
| रशिया | 9.5 अब्ज डॉलर |
| फ्रान्स | 7.7 अब्ज डॉलर |
| भारत | 2.8 अब्ज डॉलर |
| पाकिस्तान | 1.5 अब्ज डॉलर |
| इस्रायल | 1.2 अब्ज डॉलर |
| उत्तर कोरिया | 656 मिलियन डॉलर |
पाकिस्तानकडे १७० अणूबॉम्ब
SIPRI च्या अहवलानुसार पाकिस्तानकडे १७० अणूबॉम्ब आहेत. मात्र, त्यातील कोणतेही ऑपरेशन तैनातीत नाही. अहवालानुसार भारत पाकिस्तानच्या तुलनेत अधिक वेगाने अण्वस्रांचा विकास करत असून या क्षेत्रात अधिक पैसा खर्च करत आहे. इंटरनॅशनल कँपेन टू एबोलिश न्यूक्लिअर वेपन्स ( ICAN ) च्या अहवालानुसार दावा केला आहे की साल २०२५ मध्ये जगभरातील अण्वस्रांचा खर्च रेकॉर्डस्तरावर पोहचला आहे. रिपोर्टनुसार जगाने एकूण ११९ अब्ज डॉलर आण्विक अस्रांच्या विकासावर खर्च केले आहेत.