AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakash Ambedkar : आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकर यांची सर्वात मोठी मागणी; ट्विटची चर्चा

नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे देशभरात तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या भविष्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Prakash Ambedkar : आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकर यांची सर्वात मोठी मागणी; ट्विटची चर्चा
प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी
| Updated on: Jul 24, 2026 | 11:25 AM
Share

नीट (NEET EXAM) परीक्षेतील गैरव्यवहरा. पेपर लीक प्रकरणावरून देशभरात सध्या गदारोल आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले, कित्येक हताश झाले. या सर्वांच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर मोठं आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस त्याचं स्वरूप व्यापक होत चाललं आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी महिनाभर उपोषण केलं, आज त्यांनी ते उपोषण सोडलं असलं तरी सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक तसेच आंदोलनकर्ते आक्रमक असून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते ठाम आहेत.  तर सरकारने या मुद्यावर चर्चेची तयारी दाखवली असून पेपरफुटीच्या या गंभीर समस्येवर कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र याच सर्वांदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी मागणी केली आहे. नीट (NEET) रद्द करा! अशीच मागणी त्यांनी थेट केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी X वर ( पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट केली असून त्यात नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. नीट रद्द करा. शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा, असं त्यांनी लिहीलं आहे.

दिली होती महाराष्ट्र बंदची हाक 

दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी काल ( गुरूवार 23 जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यांच्या या आवहानला काल राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. . पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर असल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते याआधी म्हणाले होते. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. तर आता आज त्यांनी नीट रद्द करण्याचीच मागणी केली आहे.

पेपरफुटी रोखण्यासाठी आता आणखी कठोर कायदा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान नीटचा पेपर फुटल्याने देशभरात उग्र निदर्शने सुरू असून विद्यार्थ्यांच्या आक्रोशाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकारने आता मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार आजच्या कॅबिनेटमध्ये पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणखी कठोर कायदा करण्यासाठीचं दुरुस्ती विधेयक आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज कॅबिनेटची बैठक होणार असून यामध्ये पेपर लीकबाबतचा कायदा आणखी कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं जाणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच