अमेरिकेला धक्का, भारताने मारली थेट मोठी बाजी, कार यासोबतच या वस्तू होणार स्वस्त…

भारताने मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अखेर 18 वर्षांच्या संघर्षानंतर भारताने युरोपियन युनियनसोबत करार केला. भारताच्या या कराराकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. आता यश मिळाले असून अनेक वस्तू स्वस्तात मिळणार आहेत.

अमेरिकेला धक्का, भारताने मारली थेट मोठी बाजी, कार यासोबतच या वस्तू होणार स्वस्त...
european union and india
| Updated on: Jan 27, 2026 | 2:17 PM

सध्याच्या घडीला सर्व जगाच्या नजरा या फक्त आणि फक्त भारताकडे आहेत. तब्बल 18 वर्षाच्या मोठ्या तपानंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. आता हे करार देखील जाहीर झाले आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली आहेत. यासोबतच सर्वच देशांसोबतचे व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे काही उत्पादनांवरील कर कपात आणि थेट टॅरिफ रद्द करण्यावर सहमती देखील झाली. युरोपियन युनियनचे म्हणणे आहे की, या निर्णयानंतर भारतीय बाजारातून मोठ्या संख्येने निर्यात वाढवण्यास मदत होईल.

यासोबतच आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्यासही मदत होईल. या करारानंतर भारतीय निर्यातीत मोठी वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. हेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व करारांना करारांची जननी देखील म्हटले आहे. या करारांमुळे चीन आणि अमेरिकेत होणारी निर्यात देखील वाढेल.

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला, ज्यामुळे भारतातून होणारी निर्यात कमी झाली होती. त्याचा थेट काही क्षेत्रांमध्ये परिणाम देखील झाला होता. या करारानुसार,भारतात निर्यात होणाऱ्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त EU वस्तूंवरील शुल्क काढून टाकले जाईल किंवा कमी केले जाईल. या करारामुळे 2032 पर्यंत युरोपियन युनियनची भारताला होणारी निर्यात दुप्पट होऊ शकते.

या करारामुळे भारतासाठी नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. हा भारताचा अत्यंत मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल. या करारामुळे थेट रोजगार निर्मिती होईल. भारत आणि युरोपियन युनियनमधील या करारानंतर अनेक वस्तू कमी दरात उपलब्ध होतील. कार आणि विविध रसायनाचा यामध्ये समावेश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशात कारच्या किंमती दिवसेंदिवस महाग होताना दिसल्या. आता कुठेतरी याला लगाम लागताना नक्कीच दिसेल. बिअर, वाईन सारखे काही शीतपेय देखील स्वस्त होऊ शकतात. अन्न उत्पादनेही कमी होण्याचे संकेत आहेत.