भारताचे या देशातील तुरुंगात आहेत सर्वाधिक कैदी, नाव ऐकाल तर बसेल धक्का

काही देशातील कठोर प्रायव्हसी कायद्यांमुळे तुरुंगातील कैद्यांच्या परवानगी शिवाय त्यांची माहीती मिळत नसल्याचे म्हटले जात आहे.

भारताचे या देशातील तुरुंगात आहेत सर्वाधिक कैदी, नाव ऐकाल तर बसेल धक्का
prison
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 28, 2023 | 9:24 PM

मुंबई | 28 जुलै 2023 : आपल्या देशाची लोकसंख्या इतकी जास्त आहे की जगात दर सातवा पर्यटक हा भारतीय असतो असे म्हटले जात असते. अनेक भारतीय नोकरी आणि व्यवसायानिमित्त परदेशात राहत असतात. आता किती भारतीय कैदी परदेशातील विविध तुरुंगात सजा भोगत आहेत, याची एक धक्कादायक आकडेवारी  उघडकीस आली आहे. केंद्र सरकारने विधानसभेत गुरुवारी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहीती उघडकीस आली  आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने राज्य सभेत एक माहीती दिली आहे. त्यानूसार जवळपास 8,8330 भारतीय नागरिक परदेशातील विविध तुरुंगात विविध गुन्ह्यांखाली बंदिस्त आहेत. त्यातील एकट्या युनायटेड अरब अमिरातीमध्येच तब्बल 1,611 नागरिकांना विविध गुन्ह्याखाली बंदिस्त केले आहे. युएईमध्ये सर्वात कठोर कायदा असूनही याच देशात सर्वाधिक भारतीय तुरंगात बंद आहेत.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात युएई ( 1,611 कैदी ), सौदी अरेबिया ( 1,461 कैदी ), नेपाळ ( 1,222 ), कतार ( 696 ), कुवैत ( 446 ), मलेशिया ( 341 ), पाकिस्तान (308 ), अमेरिकेत ( 294 ),बहारीन ( 277 ) आणि युनायटेड किंग्डम ( 249 ) असे कैदी विविध गुन्ह्याखाली बंद आहेत अशी माहीती राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरण यांनी दिली आहे.

 प्रायव्हसी कायद्याचा अडसर 

178 भारतीय कैदी चीनच्या तुरुंगात आहेत. 157 इटली आणि 139 ओमानच्या तुरुंगात बंदी आहेत. नव्वद देशातील विविध तुरुंगात भारतीय सजा भोगत आहेत. परदेशातील तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांची सुटका आणि मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय सरकार परदेशातील अधिकाऱ्यांकडे नियमितपणे पाठपुरावा करीत असते असेही राज्यसभेत सांगण्यात आले आहे. काही देशातील कठोर प्रायव्हसी कायद्यांमुळे तुरुंगातील कैद्यांच्या परवानगी शिवाय त्यांची माहीती पुरविता येत नसल्यानेही या कामात अडचणी येत असल्याचे म्हटले जात आहे.