थेट भर समुद्रात भारताने फिरवला गेम, चीन आणि पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी, थेट भारतात..

इराण आणि अमेरिका युद्धाची थेट झळ भारताला बसताना दिसली. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. होर्मुज खाडी बंद असतानाही इराणने भारताचे काही जहाज सोडले. आता भारतासाठी होर्मुज खाडीतून अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे.

थेट भर समुद्रात भारताने फिरवला गेम, चीन आणि पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी, थेट भारतात..
India Jag Vikram ship
| Updated on: Apr 15, 2026 | 9:22 AM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले. 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. ज्यानंतर इराण खतरनाक झाला आणि त्याने सर्वांना सळो की पळो करून सोडले. या युद्धात आखाती देशांनाही मोठा फटका बसला. आखाती देश इराणच्या निशाण्यावर होते. अमेरिकेचे लष्कर तळ होते, अशा ठिकाणी मोठे हल्ले करण्यात आली. आखाती देशांना वाटत होते की, युद्ध इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुरतेच मर्यादित असेल पण सर्वकाही उलटे घडले. इराणकडून पहिल्या दणक्यात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने सर्वांना धक्का बसला. तेलाची निर्यात आणि आयात जवळपास ठप्प झाली. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. भारतातही एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारताचे अनेक जहाज होर्मुज खाडीत अडकून पडली. यादरम्यानच आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी येत आहे.

भारताच्या अजून एका जहाजाने होर्मुज खाडी पार केली. या जहाजात एलपीजी गॅस आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताचे अजूनही 15 जहाज होर्मुज खाडीत निघण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या सर्व जहाजांवर भारतीय झेंडे आहेत. होर्मुज खाडी पार केलेल्या या जहाजात 20000 मेट्रिक टन एलपीजी आहे. हे जहाज होर्मुज खाडी पार करून भारतात दाखल झाले.

भारताच्या या जहाजाचे नाव जग विक्रम आहे. बुधवारी नुकताच गुजरातच्या कांडला बंदर येथे जहाज दाखल झाले. अमेरिका आणि इराणने दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा केली. यादरम्यान इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीत काहीच तोडगा निघू शकला नाही, त्यानंतर अमेरिकेने होर्मुज खाडी जवळ नाकेबंदी केली. गेल्या 24 तासात होर्मुज खाडीतून 20 जहाज गेल्याची माहिती आहे.

दोन आठवड्यांकरिता करण्यात आलेल्या युद्धविरामानंतर होर्मुज खाडी पार करणारे जग विक्रम हे भारताचे पहिले जहाज आहे. या जहाजाने शुक्रवार रात्री ते शनिवार सकाळच्या दरम्यान या महत्त्वाच्या सागरी मार्गातून प्रवास केला. शनिवारी दुपारी होर्मुज खाडी पूर्वेला आणि त्यानंतर ओमानच्या आखातात पूर्वेकडे जहाज निघाले. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us