AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा दे दणका, थेट भर समुद्रात फिरवला गेम, चीनच्या दिशेने निघालेले एलपीजीचे जहाज भारतात..

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. यादरम्यानच आता भारताने मोठी बाज मारल्याचे बघायला मिळतंय. इराणी एलपीजी गॅसचे जहाज सायंकाळपर्यंत आज भारतात पोहोचण्याचे संकेत आहेत.

भारताचा दे दणका, थेट भर समुद्रात फिरवला गेम, चीनच्या दिशेने निघालेले एलपीजीचे जहाज भारतात..
LPG Gas Tanker Aurora
| Updated on: Mar 26, 2026 | 12:32 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव बघायला मिळत आहे. अमेरिकेने 2019 मध्ये इराणच्या एलपीजी गॅसवर काही निर्बंध घातले. या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून एलपीजी गॅस आणि कच्चे तेल खरेदी करणे बंद केले. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात तेलाच्या किमती जागतिक मार्केटमध्ये गणणाला पोहोचल्या आहेत. या तेलाच्या वाढलेल्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत आणि इराण यांच्यात ऊर्जा व्यापार होत आहे. 2019 नंतर हे पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. यादरम्यान इराणचे तेलवाहू जहाज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही वेळातच पोहोचेल. शिपिंग डेटाच्या रिपोर्टनुसार, ऑरोरा नावाचे प्रतिबंधित इराणी एलपीजी घेऊन निघाले आहे.

आज सायंकाळपर्यंत हे जहाज मंगलुरू बदरावर पोहोचण्याचे संकेत आहेत. मुळात म्हणजे हे जहाज भारतासाठी निघालेच नव्हते. हे एलपीजी घेऊन चीनच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, सध्याच्या बदललेली परिस्थिती बघता भारताच्या दिशेने जहाज निघाले. भारताने ट्रेडरच्या माध्यमातून जहाजामधील एलपीजी खरेदी केला आणि भारतीय रूपयांप्रमाणे त्याची खरेदी केली.

भारतात सध्याच्या घडीला एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. इराणकडून अगोदरच मोठी घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडीतून भारताला सुरक्षित मार्ग दिला जात असल्याचे इराणने स्पष्ट केले. भारत हा आमचा मित्र देश असल्याने त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देणार असल्याचे इराणकडून सांगण्यात आले. मात्र, असे असले तरीही भारताचे तब्बल 20 जहाज होर्मुज खाडीत अडकले आहेत. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.

भारताने मोठी बाजी मारत चीनच्या दिशेने निघालेले इराणी एलपीजी गॅसचे जहाज आपल्याकडे वळवले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा फटका सर्वांनाच बसत आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारकडून एलपीजी गॅस भारतात कशाप्रकारे आणला जाईल, याकरिता विविध प्रकारेच प्रयत्न केले जात आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?