
भारताच्या ऊर्जा धोरणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. गेली अनेक वर्षे आपण रशियाकडूनच कच्चे तेल विकत घेत आलो आहोत. परंतू आता चित्रच पलटले गेले आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेली माहिती आणि शिपिंग डेटाच्या ताज्या आकड्यावरुन असे कळतेय की भारताची रशियाकडून इंधन खरेदीचे प्रमाण घटत चालले आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ( एप्रिल – सप्टेंबर ) रशियाकडून इंधन खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.४ टक्के घसरली आहे.
भारताने रशियाकडून अखेर इंधन खरेदी कमी का केली ? याची दोन कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे रशियाकडून इंधन खरेदीवर जे मोठे डिस्काऊंट मिळत होते ते आता पहिल्या सारखे आकर्षक राहिलेले नाही. सवलत कमी केल्याने भारतीय रिफायनरींना रशियाकडून तेल खरेदी करणे तेवढे फायद्याचे ठरलेले नाही. दुसरे कारण म्हणजे पुरवठ्याची चणचण. या दोन्ही कारणांनी भारतीय तेल कंपन्यांना आता नवा पर्याय शोधायला मजबूर केले आहे. त्यांनी आता मध्य पूर्व आणि अमेरिका सारख्या पारंपारिक बाजाराकडे पुन्हा आपला मोर्चा वळवला आहे. आकड्यांनुसार पहिल्या सहामाहीत भारताने रशियाकडून सरासरी १.७५ मिलियन बॅरल प्रतिदिन इंधनाची (bpd)आयात केले असून जी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठा मुद्दा अमेरिकेचा वाढता दबाव देखील म्हटला जात आहे. वॉशिग्टनकडून नवी दिल्लीवर रशियाकडून तेल खरेदी कमी करण्या संदर्भात दबाव वाढल्याचे कारण आहे.व्हाईट हाऊसचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांनी तर भारत रशियाकडून कच्चे इंधन खरेदी करुन युक्रेन युद्धासाठी फंड जमा करत आहे अशी बोचरी टीका केली होती. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरीत टॅरिफ दुप्पट केला आहे. यास कमी करण्यासाठी रशियाकडून इंधन खरेदीची कपात करणे हा एक पर्याय मानला गेला आहे.अमेरिकेचे व्यापार सचिव स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट सांगितले होते की भारताला त्यांच्या कच्चे तेल खरेदीत संतुलन आणावे लागेल.याचा अर्थ त्याला अमेरिकेकडून जास्त आणि रशियाकडून कमी इंधन खरेदी करावे लागेल. भारत सरकारच्या एका सूत्रांनी या दुजारा देत अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादनाची वाढलेली खरेदी दोन्ही देशात होणाऱ्या व्यापार चर्चेच्या फलनिष्पत्ती जोडली गेली आहे.
सप्टेंबरच्या आकड्यांकडे पाहिले असता भारताने रशियाकडून १.६ मिलियन बॅरल प्रतिदिन तेल खरेदी केली असून, ती ऑगस्ट महिन्याच्या बरोबरीची आहे. परंतू गेल्या सप्टेंबरच्या तुलनेत १४.२ टक्के कमी आहे.विशेष म्हणजे या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी सारख्या खाजगी रिफायनरीनी रशियाकडून आयात वाढवली तर सरकारी रिफायनरींनी आपली खरेदी कमी केली आहे.
या विरुद्ध एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान भारताची अमेरिकेकडून कच्च तेलाची आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत ६.८ टक्के वाढून २१३,००० बॅरल प्रतिदिन झाला आहे. यामुळे भारत आपल्या तेल खरेदीत विविधता आणत आहे. त्यामुळे एकूण भारताच्या इंधन आयातीमधून रशियाचा हिस्सा ४० टक्क्यावरुन घसरून सुमारे ३६ टक्क राहिला आहे. तर मध्य पूर्वेतील हिस्सा ४२ टक्क्यांवरुन वाढून ४५ टक्के झाली आहे. यामुळे OPEC देशांची एकूण हिस्सेदारी देखील ४५ टक्क्यांवरुन ४९ टक्क्यांवर पोहचली आहे. त्यामुळे भारत त्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पारंपारिक पुरवठादारांवर विश्वास दाखवत आहे.