अमेरिकेतून भारतासाठी आली गुड न्यूज, पाकिस्तानचे बारा वाजणार, त्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी

बऱ्याच काळापासून भारताच एक रखडलेलं एक काम झालं आहे. अमेरिकेतून भारतासाठी एक गुड न्यूज आली आहे. ही बातमी अशी आहे की, त्यामुळे पाकिस्तान-चीनच टेन्शन नक्कीच वाढेल. भारताची रणनितीक शक्ती अधिक वाढणार आहे.

अमेरिकेतून भारतासाठी आली गुड न्यूज, पाकिस्तानचे बारा वाजणार, त्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी
Operation Sindoor
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jul 15, 2025 | 2:32 PM

भारताला अमेरिकेकडून गुड न्यूज मिळाली आहे. जेट इंजिन बनवणारी कंपनी GE ने भारताला दुसरं इंजिन GE-4 सोपवलं आहे. या इंजिनचा वापर हलक्या लढाऊ विमानांमध्ये केला जाणार आहे. हे इंजिन स्वदेशी बनावटीच्या LCA (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) तेजस मार्क-1 मध्ये लावलं जाणार आहे. या एकावर्षात हिन्दुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला असे एकूण 12 इंजिन्स मिळण्याची शक्यता आहे. HAL कडून तेजस मार्क-1 विमानाची निर्मिती केली जाते.

ANI रिपोर्टनुसार भारताला दुसरं GE-404 इंजिन मिळालं आहे. इंडियन एअर फोर्सने 83 LCA मार्क-1 ए फायटर जेट्सची HAL ला ऑर्डर दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अशी अजून 97 विमानं खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे इंडियन एअरफोर्सची ताकद अजून वाढेल. शेजारी देश पाकिस्तानसाठी ही टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

किती मिलियन डॉलर्सचा करार?

एका रिपोर्टनुसार संरक्षण सचिव राजेश सिंह यांनी सांगितलं की, भारताच्या तेजस मार्क-1ए फायटर जेटसाठी GE (जनरल इलेक्ट्रिक) F404-IN20 इंजिन्सचा पुरवठा सुरु झालाय. GE मार्च 2026 पासून दर महिन्याला दोन इंजिन्स पाठवू शकतो. भारताने जनरल इलेक्ट्रिकसोबत 761 मिलियन डॉलर्सचा करार केलेला. या अंतर्गत फायटर जेट्ससाठी इंजिन विकत घेतले जाणार आहेत.

भारताकडे कुठल्या प्रकारची फायटर विमान?

इंडियन एअर फोर्सकडे अनेक प्रकारचे फायटर एअरक्राफ्ट्स आहेत. जे कुठल्याही पद्धतीने हल्ला करण्यासाठी तयार आहेत. प्रत्येक एअरक्राफ्टची वेगळी क्षमता आहे. या लिस्टमध्ये Su-30 MKI, राफेल, तेजस, मिग-29, मिराज 2000, जगुआर आणि मिग-21 फायटर विमानं आहेत.

ऑपरेशन सिंदूरवेळी दाखवली ताकद

दोन महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने आपली हवाई शक्ती दाखवून दिली होती. सध्या भारताकडे राफेल हे अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध कारवाईच्यावेळी राफेल विमानांचा वापर केला होता. राफेलमुळे आज भारताकडे आपल्याच हवाई हद्दीत राहून पाकिस्तानवर वार करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. भारताने पाकिस्तानचे एअरबेस उडवून दिले होते.