
भारत आणि अमेरिकेदरम्यान सध्या टॅरिफच्या मुद्यावरून बिनसलं आहे. रशियाकडून तेलखरेदीच्या भारताच्या निर्णयामुळे अमेरिका नाराज असून ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. हे अन्याय्य असल्याचे सांगत भारताने मात्र आपली भूमिका ठाम ठेवत अमेरिकेसमोर न झुकण्याचा निर्णय घेतला आहे. इतर काही देशांवरही अमेरिकेने टॅरिफ लादला असून ते महासत्तेपुढे झुकले आहेत, भारताने मात्र तसे न केल्यान अमेरिकेचा जळफळाट झाला आहे. आणि त्याचत आता भारताने रशियाबाबत असं एक पाऊल उचललं आहे, ज्यामुळे तर अमेरिकेचा तिळपापड होईल, त्यांचं टेन्शन आणखीनच वाढण्याची चिन्हे आहेत.
खरंतर रशिया आणि बेलारूस यांनी आयोजित केलेल्या Zapad-20205 लष्करी सरावात भारताने भाग घेतला आहे. या सरावात 65 भारतीय सैनिक सहभागी झाले होते असे भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितले. 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान झालेला हा पाच दिवसांचा संयुक्त सराव भारत आणि रशियाच्या दीर्घकालीन संरक्षण संबंधांचा एक भाग आहे. पण त्यामुळे अमेरिकची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे.
या सरावात सुमारे 1 लाख सैनिकांनी भाग घेतला, त्यांनी अण्वस्त्रधारी बॉम्बर, युद्धनौका आणि जड तोफखाना तैनात केला होता. लष्करी गणवेश परिधान केलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी निझनी नोव्हगोरोडमधील मुलिनो प्रशिक्षण मैदानाला भेट दिली. तसेच या मोठ्या प्रमाणावरील सरावाच्या परिस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला, अशी माहिती समोर आली आहे.
हे सराव संरक्षण मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी तयारी दर्शविण्यासाठी आयोजित केले गेले होते, असे पुतिन म्हणाले. रशियामधील हे सराव रशिया आणि बेलारूसमधील 41 प्रशिक्षण स्थळांवर झाल्याचे वृत्त क्रेमलिनने दिले आहे. यामध्ये पाणबुड्यांसह 333 विमाने आणि 247 नौदल जहाजांचा समावेश होता.
भारताच्या भागीदारामुळे वाढली अमेरिकेची चिंता
दरम्यान या सरावात भारताच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधले आहे, त्याचे कारण म्हणजे सध्या भारत-अमेरिका संबंध व्यापार आघाडीवर ताणलेले आहेत. रशियन वृत्तसंस्था TASS च्या वृत्तानुसार,रशियासोबत “सहकार्य आणि परस्पर विश्वास” मजबूत करणे हे भारताच्या सहभागाचे उद्दिष्ट आहे.
पण भारताने उचललेल्या या पावलामुळे अमेरिकेत चिंता वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका भारताकडे आशियामधील चीनला एक प्रमुख प्रति-समतोल म्हणून पाहतो आणि रशियासोबत भारताची भूमिका अमेरिकन धोरणकर्त्यांसाठी प्रश्न निर्माण करू शकते.
अमेरिका देखील पहिल्यांदाच बनला निरीक्षक
या वर्षीचा Zapad-2025 सराव हा उल्लेखनीय होता कारण त्यात सहभागी झालेल भारत हा एकमेव परदेश नव्तात. तर यामध्ये इराण, बांगलादेश, बुर्किना फासो, कांगो लोकतांत्रिक गणराज्य माली येथील कार्यदलांनीही भाग घेतला होता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रशिया आणि बेलारूसमधील या संयुक्त सरावाचे अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनीही निरीक्षण केले. 2022 साली रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेने पहिल्यांदाच असे आमंत्रण स्वीकारले.