होर्मुज खाडीत भयंकर घडतंय, भारताने घेतला थेट निर्णय, इराण अमेरिका..
इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. होर्मुज खाडी काल इराणकडून सुरू करण्यात आली. पण इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा होर्मुज खाडी बंद झाली. यादरम्यानच भारताचे अनेक जहाज होर्मुजमध्ये अडकली आहेत.

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. या युद्धामुळे अनेक देश संकटात आहेत. इराण आणि अमेरिकेने युद्धबंदी दोन आठवड्यांसाठी जाहीर केली. पण इस्त्रायलकडून लेबनॉनवर हल्ला केला जात आहे. ज्यात अनेक नागरिकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी अनेक देशांचे जहाज अडकून पडले आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचे मोठे संकट आहे. पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणाव वाढताना दिसत आहे. भारताने आखाती प्रदेशात अडकलेली आपली जहाजे आणि खलाशी यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी एक मोठा मास्टर प्लॅन तयार केला. पेट्रोलियम मंत्रालय आणि नौवहन मंत्रालयाच्या संयुक्त मूल्यांकनानुसार, एकूण 18 जहाजांचा प्राधान्यक्रमाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे
यापैकी पाच जहाजे भारतीय ध्वज असलेली आहेत. उर्वरित जहाजे परदेशी ध्वज असलेली आहेत. त्यावर भारतीय खलाशी आहेत. होर्मुज खाडीत सध्याच्या घडीला भारताला 15 जहाज असल्याची माहिती मिळत आहे. पुन्हा एकदा स्थिती गंभीर झाल्याने इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, कोणीही परवानगीशिवाय होर्मुज खाडीचा वापर करू नये. इराणकडून सुरक्षित मार्ग दिल्याशिवाय. होर्मुज खाडीत अडकलेले जहाज काढण्यासाठी अमेरिका-इस्त्रायल आणि इराणच्या मदतीने भारताने खास प्लॅनिंग केले.
मिळालेल्या माहितीनुसार, 2000o भारतीय खलाशी पर्शियन आखातीत विविध जहाजांवर तैनात आहेत. सध्याच्या युद्धात त्यांच्या जीवाला धोका आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा कच्च्या तेलाचा दैनंदिन प्रवाह 20 दशलक्ष बॅरल होता. त्यामध्येच आता प्रतिदिन सुमारे 2.6 दशलक्ष बॅरलपर्यंत कमी झाला आहे. ही घट जागतिक ऊर्जा बाजारासाठी चिंतेचे कारण बनली आहे. भारताकडून होर्मुजमध्ये अडकलेले आपले सर्व जहाज काढण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला. विशेष म्हणजे अमेरिका आणि इराणही मदत करणार आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जग विक्रम, सर्व शक्ती, एमटी देश विभव, एमटी देश शौर्य आणि सिंगापूर लॉयल्टी यांसारखे जहाज होर्मुजमध्ये अडकली आहेत. एलएनजीसी दिशा आणि अल घशामिया यांसारख्या परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरही भारतीय कर्मचारी आहेत. सध्याच्या घडीला या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढणे महत्वाचे आहे. सर्व जहाजांची सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलासोबत समन्वय केली जात आहे.