AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, ती एक गोष्ट नडली, थेट जगापुढे नाकावर..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. लवकरच युद्धबंदीवर बैठक होईल. मात्र, इराण अजूनही आपल्या काही मागण्यांवर ठाम आहे. कुठे ना कुठे या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, ती एक गोष्ट नडली, थेट जगापुढे नाकावर..
Donald Trump
| Updated on: Apr 09, 2026 | 9:25 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद व्हावे, अशी जगाची इच्छा होती. थेटपणे जगाला या युद्धाचा फटका बसला. दोन आठवड्यांकरिता इराण आण अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतर इराणने होर्मुज खाडी सुरू केली. पण त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर स्थिती पुन्हा भयंकर झाली. पुन्हा होर्मुज खाडी बंद झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने पुन्हा जग संकटात आले. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकटी पडताना दिसली. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेने स्वत:च्या तोंडाने काही देशांचे नाव घेत होर्मुजमध्ये मदत मागितली होती. पण एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नसल्याचे बघायला मिळाले. शेवटी अमेरिकेने थोड्या काळासाठी युद्धातून माघार घेतली. अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानमध्ये युद्धबंदी कराराकरिता बैठक ठेवण्यात आली. दोन्ही देशांमध्ये लवकरच युद्धबंदी करार होईल सांगितले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत संताप बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून एक छोटीशी गोष्ट हिसकावून घेतली. नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प प्रचंड संतापले होते. व्हेनेझुएलामधील सहजतेमुळे त्यांना आणखीच प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर त्यांनी थेट इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच ते फसले.

अमेरिकेला इराणसोबतच्या युद्धात ओढण्याची वाट गेल्या 40 वर्षांपासून इस्त्रायल बघत होते. इस्त्रायलला देखील माहिती होते की, आपण एकटे कधीच इराणसोबत लढू शकत नाहीत. अमेरिकेने साथ दिली तर हे शक्य आहे. अमेरिकेने साथ दिली पण इराणने ज्या पद्धतीने युद्धात उत्तर दिले, त्याचा विचार कदाचित जगातील एकही देशाने केला नसावा.

इराण दोन ते तीन आठवड्यांत अणुबॉम्ब बनवून इस्रायलवर टाकेल, याची ट्रम्प यांना जाणीव करून देण्यात आली. मात्र, इराणसोबतचे युद्ध अमेरिकेला भारी पडल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेचे युद्धात नुकसान झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते होते की, इराणला 4 आठवड्यांमध्ये आपण हारू शकतो. पण प्रत्यक्षात आपला डाव आपल्यावरच उलटा पडताना डोनाल्ड ट्रम्प यांना दिसला.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?