AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुड न्यूज, भारताने करून दाखवलेच, थेट अर्थव्यवस्था..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगाला नाकीनऊ आले. युद्धबंदीची घोषणा अमेरिका आणि इराणकडून करण्यात आली पण अजूनही संकट टळले नसल्याचे पुढे आले. यादरम्यानच भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. भारताने करून दाखवल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुड न्यूज, भारताने करून दाखवलेच, थेट अर्थव्यवस्था..
Indian Economy
| Updated on: Apr 09, 2026 | 8:56 AM
Share

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जग संकटात आहे. जागतिक बाजारपेठेवर या युद्धाचा थेटपणे परिणाम होताना दिसला. जागतिक बाजारात तेलाच्या किमती सतत वाढताना दिसत आहे. जग होरपळले जात आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली. या संकटामुळे जग संकटात असताना भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. जगात अत्यंत मोठ्या वेगाने पुढे जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे पुढे आले. इराण आणि अमेरिका युद्धात जगाचे तीनतेरा वाजलेले असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. जागतिक बँकेनेही हे मान्य केले. भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून एक दिलासादायक बातमी दिली आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.6 च्या वेगाने पुढे गेली.

कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम बघायला मिळाला. पण भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे पुढे आले. जागतिक बँकेने बुधवारी एप्रिल 2026 साठीचा दक्षिण आशिया आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 ने वाढल्याचे नमूद करण्यात आले.

भारताच्या अर्थव्यवस्थेचे हे मोठे यश म्हणावे लागले. कारण इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. यासोबतच शेअर मार्केटवरही या युद्धाचा परिणाम बघायला मिळाला. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये, जागतिक बँकेने 6.3 टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला होता. त्या तुलनेने भारताने धमाकेदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे.

जागतिक बँकेने आपल्या अहवालात भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवताना पुढे म्हटले आहे, जीएसटी दरांमध्ये म्हणजेच वस्तू आणि सेवांवरील करात कपात झाल्यामुळे आर्थिक वर्षात वाढ झाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारतासाठी ही आनंदाची बातमी म्हणावे लागेल. भारतात सध्या एलपीजी गॅसचे मोठे संकट आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने तुटवडा निर्माण झाला. भारतासोबतची मैत्री लक्षात घेता इराणकडून भारतीय जहाज काही प्रमाणात सोडले जात आहेत.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.