AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तीच घोषणा इराणकडून, मोठी खळबळ, थेट नवीन..

इराण आणि अमेरिका युद्धात महत्वाच्या घडामोडी घडताना दिसल्या. काही दिवसांकरिता युद्धबंदीची घोषणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर इस्त्रायल आक्रमक भूमिकेत देत आहेत. जगाला ज्याची भीती होती तो निर्णय इराणने घेतला आणि मोठी घोषणा केली.

जगाला ज्याची भीती तीच घोषणा इराणकडून, मोठी खळबळ, थेट नवीन..
Strait of Hormuz
| Updated on: Apr 09, 2026 | 8:19 AM
Share

मध्य पूर्वेतील तणाव काल कमी होताना दिसला. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढला. इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराण भडकला आहे. यासोबतच इराणकडून काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करण्यात आल्या. त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याने जगाला ज्याची भीती तोच निर्णय इराणकडून घेण्यात आला. इस्त्रायलने हल्ले थांबवली नसल्याने इराण भडकला आहे. इराणकडून थेटपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आली. यासोबतच मोठा इशारा देत इराणने म्हटले की, इराणची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही जहाजाने होर्मुज खाडी पार करू नये. इराणच्या नाैदलाने पुन्हा एकदा होर्मुज खाडी ताब्यात घेतल्याचे कळतंय. अमेरिकेकडून होर्मुज खाडी खुली करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आली. पण त्यांना शेवटपर्यत जमलेच नाही. अमेरिकेकडून इराणवरील हल्ले रोखण्यात आली. त्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली. मात्र, पुन्हा तेच घडले.

लेबनॉनवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर होर्मज खाडीत घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्य मार्गावर सागरी सुरुंगांचा वाढता धोका असल्याचे कारण देत इराणकडून जहाजांना पर्यायी सागरी मार्ग दिला जाणार असल्याची घोषणी करण्यात आली. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, इराणने म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारी जहाजे आता नव्याने निश्चित केलेल्या मार्गाचा वापर करू शकतील.

पण कोणालाही परवानगीशिवाय होर्मुज खाडी पार करता येणार नाही. इराणकडून अमेरिकेने केलेल्या घोषणेनंतर सुरक्षित मार्ग जहाजांना दिला जात होता. पण लेबनॉनवरील हल्ल्यात अनेक लोक ठार झाले. त्यानंतर इराण पुन्हा आक्रमक झाला. होर्मुज खाडी सर्वांसाठी खुली नसल्याचे इराणकडून जाहीर करण्यात आले.

होर्मुज खाडी खुली झाल्याने संपूर्ण जग आनंदात होते. पण हा आनंद काही तासांकरिताच राहिला. पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराणकडून आपल्या मित्र देशांना होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता दिला जात आहे. अमेरिकेने काही दिवसांकरिता या युद्धातून माघार घेतली. पण इस्त्रायल अजूनही आक्रमक भूमिकेत दिसत आहे. युद्ध अधित तापताना दिसत आहे. सुरूवातीपासूनच या युद्धात अनेक देश होरपळत आहेत.

Follow Us
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट