AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्र मित्र म्हणत चीनने दिला मोठा दणका, भारतात खळबळ, थेट भर समुद्रात चीनी..

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात जग गुंतलेले असताना धक्कादायक माहिती पुढे येत आहे. चीनचा खरा चेहरा जगापुढे आला. मात्र, भारतासाठी ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. चीनची चोरी थेट इंडोनेशियाने पकडली आहे.

मित्र मित्र म्हणत चीनने दिला मोठा दणका, भारतात खळबळ, थेट भर समुद्रात चीनी..
Chinese torpedo like device
| Updated on: Apr 18, 2026 | 1:09 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग अगोदरच गॅसवर आहे. त्यामध्येच भारताचे मोठे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. इंडोनेशियातील लोम्बोकच्या होर्मुज बंदरात एक टॅर्पिडोसारखे उपकरण सापडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे उपकरण थेट भर समुद्रात सापडले. संरक्षण तज्ज्ञांनी त्याची ओळखही पटवली आहे. चीनची पाण्याखालील निगराणी प्रणाली म्हणून त्याची ओळख पटली. चीनच्या गुप्त हेरगिरीच्या डावपेचांचा पुन्हा पर्दाफाश झाला. मात्र, यामुळे भारतात खळबळ उडाली. गिली ट्रावांगन बेटाच्या उत्तरेकडील एका मच्छीमाराने आपल्या मासेमारीच्या जाळ्यात हे उपकरण पकडले. त्यानंतर इंडोनेशियाच्या नाैदलाने त्याला जप्त केले. सध्या त्यांच्याकडून अधिकचा तपास केला जात आहे. नौदलाचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल तुंगगुल म्हणाले की, आम्ही त्यांचा उगम उद्देश आणि नक्की त्याच्याबद्दल माहिती काढत आहोत आणि चाैकशी करत आहोत.

पाण्याखालील निगराणी प्रणाली असलेल्या या यंत्रात डीप सी रिअल टाइम ट्रान्समिशन मूरिंग सिस्टीम बसवण्यात आली. हे उपकरण हेलगिरी करण्यास मदत करते. उपकरण सागरी संरक्षण तज्ञ एच. आय. सटन यांनी चिनी 710 संशोधन संस्थेच्या सहकार्याने विकसित केले आहे. समुद्रतळाशी स्थिर केलेले हे उपकरण पाण्याची खोली तपासते.

हेच नाही तर प्रवाहांची रिअल टाइम माहितीही देते. या यंत्राच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी शत्रू देशांपर्यंत पोहोचते. हे यंत्र इंडोनेशियात सापडले असले तरीही भारताचे टेन्शन वाढले आहे. चीन यंत्र जर इंडोनेशियाच्या हद्दीत पाठवू शकतो तर भारताच्या समुद्र हद्दीत देखील अशाप्रकारची यंत्र असण्याची दाट शक्यता आहे. भारताच्याही समुद्र हालचालीवर लक्ष ठेवले जाऊ शकते.

हा एक चीनी रणनीतीचा मोठा भाग असल्याचेही सांगितले जात आहे. मलाक्काची भीती चीनला वाटते. चीनचे 80 टक्के तेल मलाक्काच्या खाडीतून जाते. युद्धात भारत किंवा इतर एखाद्या देशाने सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेता तर चीनच्या अर्थव्यवस्थेला थेटपणे धक्का बसू शकतो. याकरिता चीनकडून समुद्रात अशाप्रकारे काम केले जाते. मात्र, ही भारतासाठी अत्यंत धोकादायक घटना असल्याचे सांगितले जाते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...