भारताला ज्याची भीती तेच घडले, इराण अमेरिका युद्धात पहिला मोठा दणका, थेट एलपीजी गॅसच्याच…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यामध्येच आता भयंकर आणि धक्कादायक अशी माहिती पुढे येत आहे. भारताला या युद्धात पहिला मोठा धक्का बसला आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा अधिक धोक्यात येऊ शकतो.

भारताला ज्याची भीती तेच घडले, इराण अमेरिका युद्धात पहिला मोठा दणका, थेट एलपीजी गॅसच्याच...
LPG gas project attack
| Updated on: Mar 19, 2026 | 8:00 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. इराण आता अधिक घातक झाला असून जिकडे वाट्टेल तिकडे हल्ले करत आहे. आखाती देशांवरील हल्ले इराणकडून वाढली आहेत. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम अख्ख्या जगावर होत आहे. इराणकडून महत्वाचा होर्मुज मार्गही बंद करण्यात आला. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे. शिवाय जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. जगात या युद्धामुळे हाहाकार माजला आहे.   पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्व, हे एक पूर्णपणे रणांगण बनले आहे. हे युद्ध जरी थेट इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात लढले जात असले तरीही त्याच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. आखाती देशांमधील हल्ल्यांमुळे भारतासाठी चिंता वाढत आहे. त्यामध्येच भारताला धक्का देणारी बातमी कतारमध्ये आली आहे.

पर्शियन आखातातील इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्र आणि संबंधित पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यानंतर इराण अमेरिका-इस्रायलच्या मित्र राष्ट्रांवर सूड घेत आहे. इराणने कतारच्या ऊर्जा सुविधांना वारंवार टार्गेट केले. बुधवारी संध्याकाळी इराणने कतारच्या रास लाफान औद्योगिक शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

कतार एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कतारचे मोठे नुकसान झाले आहे.  या हल्ल्याच्या परिणामामुळे गॅस आणि तेलाच्या किमती वाढतील. या हल्ल्याचा कतारपेक्षाही जर कोणावर अधिक परिणाम होत असेल तर तो भारत आहे. कारण कतार हा भारताचा सर्वात मोठा गॅस पुरवठादार आहे. कतारकडून भारतात मोठ्या संख्येमे एलपीजी गॅस दाखल होतो.

अंदाजानुसार, भारतात कतारमध्ये साधारणपणे 47 टक्के गॅस येतो. 27 दशलक्ष टन एलएनजी आयात भारत कतारकडून करतो. कतारच्या गॅस सुविधांवर हल्ले सुरू होत असल्याने याचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण नुकसान जास्त झाले तर कंपन्या गॅस उत्पादन थांबू शकतात आणि यासोबतच किमतीमध्येही मोठी वाढ करू शकतात. आता इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतावर होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us