भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाकिस्तानचा थरकाप उडणार, 10 हजार कोटींची मोठी डील

भारताने आधीच तीन स्क्वॉड्रन विकत घेतले आहेत, ज्यांचा वापर सुरु आहे. चौथ्या स्क्वॉड्रनच्या डिलिव्हरी आधी युद्ध सुरु झालं. उर्वरित दोन स्क्वॉड्रन लवकरात लवकर देण्याची भारताने मागणी केली आहे.

भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाकिस्तानचा थरकाप उडणार, 10 हजार कोटींची मोठी डील
Rafale
| Updated on: Oct 22, 2025 | 9:21 AM

भारत लवकरच S-400 एअर डिफेन्स सिस्टिमसाठी रशियाकडून मोठ्या संख्येने मिसाइल विकत घेण्याच्या तयारीत आहे. हा करार जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा आहे. पाकिस्तान विरुद्ध S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने आपली उपयुक्तता सिद्ध केली. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी चार दिवसाच्या संघर्षात पाकिस्तानचे सहा फायटर जेट्स आणि एक हेरगिरी करणारं विमान पाडलं. हे हेरगिरी करणारं विमान 300 किलोमीटर अंतरावरुन भारताने पाडलं. इंडियन एअर फोर्सने S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गेमचेंजर असल्याचं म्हटलं आहे.

एअर फोर्सला आपला एअर डिफेन्स अजून भक्कम करायचा असल्याने ही मिसाइल्स विकत घ्यायची आहेत, असं सुत्रांनी सांगितलं. या करारावरुन भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरु आहे. संरक्षण मंत्रालयाची सुरक्षा खरेदी परिषदेची बैठक 23 ऑक्टोंबरला होणार आहे. त्यामध्ये या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते.

दोन स्क्वॉड्रन लवकर द्या

हवाई सुरक्षा भक्कम करण्यासाठी अजून S-400 स्क्वॉड्रनचा समावेश करण्याची इंडियन एअर फोर्सची योजना आहे. रशियाकडून भारताने आधीच तीन स्क्वॉड्रन विकत घेतले आहेत, ज्यांचा वापर सुरु आहे. चौथ्या स्क्वॉड्रनच्या डिलिव्हरी आधी रशिया-युक्रेन युद्ध सुरु झालं. उर्वरित दोन स्क्वॉड्रन लवकरात लवकर देण्याची भारताने रशियाकडे मागणी केली आहे.

S-500 एअर डिफेन्स सिस्टिमच्या व्यवहाराबाबत चर्चा

दोन्ही देशांमध्ये आता S-500 एअर डिफेन्स सिस्टिमच्या व्यवहाराबाबत चर्चा सुरु आहे. भारत रशियाकडून एअर-टू-एअर मिसाइल खरेदी करण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन (बियॉन्ड विजुअल रेंज) म्हणजे नजरेपलीकडील लक्ष्य भेद करण्याची क्षमता वाढेल. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइलची क्षमता वाढवण्यासंदर्भात भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सैन्य संबंध मजबूत आहेत. इंडियन एअरफोर्सची स्ट्राइक क्षमता वाढवण्यासंदर्भात रशियन टेक्निकवर आधारीत आहे.

तब्बल 300 किलोमीटर अंतरावरुन विमान पाडलं

S-400 एअर डिफेन्स सिस्टिम भारताच्या सुदर्शन चक्र मिशनचा महत्वाचा भाग आहे. कुठलही बॅलेस्टिक मिसाइल, फायटर जेट या मिसाइलच्या रेंजमधून सुटू शकत नाही. पाकिस्तानला हे चांगलं ठाऊक आहे. त्याची मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे. तब्बल 300 किलोमीटर अंतरावरुन भारताने पाकिस्तानच एक महत्वाचं विमान पाडलं. इतक्या अंतरावरुन विमान पाडल्याची ही पहिली घटना आहे. त्यामुळे S-400 वरचा विश्वास वाढला.