India US Tariff Row : नादान ट्रम्प या 3 कारणांमुळे भारतावर इतके रागवलेत, अमेरिकेला खुपणारी तीन कारणं कुठली?

India US Tariff Row : चर्चेच्या दीर्घ फेऱ्या झाल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र म्हणणाऱ्या भारतावरच 50 टक्के टॅरिफ आकारला. ते सध्या सातत्याने भारताविरोधात कठोर शब्दांचा वापर करत आहेत. मागच्या काही महिन्यांपासून भारताबद्दलची त्यांची भूमिका बदलल्याच दिसून येतय. यामागे तीन कारणं आहेत.

India US Tariff Row : नादान ट्रम्प या 3 कारणांमुळे भारतावर इतके रागवलेत, अमेरिकेला खुपणारी तीन कारणं कुठली?
| Updated on: Aug 07, 2025 | 1:37 PM

टॅरिफ मुद्यावरुन सध्या भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता एकतर्फी 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. काही काळापूर्वी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इतकं गुणगान करणारे ट्रम्प इतके कठोर का झालेत?. त्यांनी थेट 50 टक्के टॅरिफ आकारला. अन्य देशांबाबत त्यांनी मात्र नरमाईच धोरण दाखवलं आहे. या सगळ्यामागे काय कारण आहे? अमेरिकेला काय हवय?

याचं थेट उत्तर असं आहे की, भारताने आपल्या इशाऱ्यावर नाचावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत मात्र असं करायला तयार नाही. कुठल्याही विषयावर, मुद्यावर आपली स्वतंत्र भूमिका घेण्यावर भारत ठाम आहे. भारताचा तो अधिकार आहे. पण अमेरिकेला हे मान्य नाहीय. भारतावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका आता टॅरिफला मोठं अस्त्र बनवत आहे.

खटकणारा पहिला मुद्दा

रशिया-युक्रेन मुद्यावर भारताने जी तटस्थ भूमिका घेतली, ती अमेरिकेला आवडली नाही. भारताने आपल्या हो ला हो करावं, अशी वॉशिंग्टनची इच्छा आहे. युक्रेन बरोबर युद्ध सुरु झाल्यापासून भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरु आहे. भारताच्या तेल खरेदीमुळे मॉस्कोला युद्ध सुरु ठेवण्यासाठी बळ मिळतय असं अमेरिकेच मत आहे. त्यामुळे पुतिन युक्रेनसोबत युद्ध संपवायला तयार नाहीयत. चीन सुद्धा रशियाकडून तेल खरेदी करतोय, तो पहिल्या नंबरवर आहे.

दुसरा खटकणारा मुद्दा

रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, एवढीच अमेरिकेची इच्छा नाहीय, तर भारताने पारंपारिक मित्र रशिया आणि ब्रिक्स परिषद सोडून पाश्चिमात्य देशांच्या गटात सहभागी व्हावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारताचं परराष्ट्र धोरण आपल्याला अनुकूल असावं असा अमेरिकेचा सुरुवातीपासून प्रयत्न राहिला आहे. ब्रिक्समध्ये भारताशिवाय ब्राझील, चीन, रशिया हे महत्त्वाचे देश आहेत. अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याचा ब्रिक्सचा प्रयत्न आहे.
अमेरिकेला चीन विरोधात भारताचा वापर करायचा आहे. रशिया विरुद्ध जसा त्यांनी युक्रेनचा वापर केला, तसचं त्यांना भारताचा चीन विरोधात वापर करायचा आहे.

खटकणारा तिसरा मुद्दा

अमेरिका भारताच्या स्ट्रेटेजिक ऑटोनोमीने हैराण आहे. भारत त्याला जे योग्य वाटेल त्याचा पुरस्कार करतो हे ट्रम्प यांना पटत नाहीय. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने ट्रम्प यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न नाकारला. आपणच भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर घडवून आणलं असा ट्रम्प यांचा दावा आहे. पाकिस्तान ट्रम्प यांचं कौतुक करुन थकत नाहीय. पण भारत, दोन देशांनी आपसात चर्चा करुन हा प्रश्न सोडवला. यात अमेरिकेच काही देणघेण नाहीय असच म्हणतोय. भारताची ही स्वतंत्र भूमिका अमेरिकेला पटत नाहीय.