
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला आहे. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी चकमक पहायला मिळाली होती. भारताने पाकिस्तामध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरने भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानची शस्त्रे भारताचा भूगोल बदलू शकतात असं मुनीर यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
असीम मुनीरने एका कार्यक्रमात म्हटले की, ‘पाकिस्तानी लष्कराने प्रत्येक युद्धात क्षमता दाखवली आहे. भविष्यात जर कोणत्याही शत्रूने आपल्या देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आपण सडेतोड उत्तर देऊ. पाकिस्तानची शस्त्रे आता भारताचा भूगोल बदलण्यास सक्षम असतील. हा हल्ला इतका गंभीर असेल की भारत तो कधीही विसरणार नाही.’
पुढे बोलताना मुनीरने म्हटले की, मी भारतीय लष्कराला सांगतो की अणु शस्त्रे असाणाऱ्या देशांमध्ये युद्ध होणे शक्य नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार संवाद साधून प्रश्न सोडवले पाहिजेत. याबाबतची चर्चा आदराने केली पाहिजे. आम्ही भारतीय नेत्यांच्या भाषणाला घाबरणारे नाहीत, आम्ही योग्य उत्तर देण्यास तयार आहोत.
🚨 Breaking 🇵🇰🪖
Failed Marshal Asim Munir Issues Nuclear and Economic Threats to India.
Should a fresh wave of hostilities be triggered, Pakistan would respond much beyond the expectations of the initiators. The resulting retributive military and economic losses inflicted will… pic.twitter.com/2IHveD16ox
— OsintTV 📺 (@OsintTV) October 18, 2025
आपल्या सर्वांना माहिती आहे की, पाकिस्तान हा अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय बँकेच्या कर्जावर जगणारा देश आहे. देशात गरीबी आहे, पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. मात्र तरीही पाकिस्तानी नेते भारताला धमकी देत आहेत. आपल्या भाषणात मुनीरला दम लागला होता. थोडा वेळ थांबत त्याने आपले भाषण संपवले. आता भारत पाकिस्तानच्या या धमकीला काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानची झोप उडवली होती. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर हल्ला केला होता, यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने आक्रमक कारवाई करत अनेक पाकिस्तानी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे आता अनेक पाकिस्तानी नेते हे बरळताना दिसत आहेत.