पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडल्याचा दावा खरा? चिंता वाढली

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे …

पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडल्याचा दावा खरा? चिंता वाढली

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे एका भारतीय पायलटला अटक केल्याचं पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर गफूर यांनी म्हटलंय. भारताचे दोन विमान पाडले, एक काश्मीरमध्ये, तर दुसरं पीओकेमध्ये पाडलं, असा दावा पाकिस्तानने केलाय. विंग कमांडर अभिनंदन कुमार असं या पायलटचं नाव सांगत पाकिस्तानकडून व्हिडीओ जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाचा एक पायलट बेपत्ता असल्याचं हवाई दलातील सूत्रांचं म्हणणं आहे.

पाकिस्तानकडून विंग कमांडर नाव सांगत असणारा व्हिडीओ जारी करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये अभी नाव लिहिलेला पायलट दिसत आहे. पण या व्हिडीओच्या सत्यतेबाबत शंका आहे. कारण, भारताने अधिकृतपणे ही बाब अजून स्वीकारलेली नाही. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच भारताकडून भूमिका जाहीर केली जाऊ शकते.

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पाकिस्तानी पायलट पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारत असल्याचंही दिसून आलं.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *