पाकिस्तान हादरला, भारताच्या त्या एका निर्णयाने उडाली झोप, सीमेवर तणाव, कोणत्याही क्षणी होऊ शकतो विनाश

गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात राहिले आहेत. पाकिस्तान कायमच सीमेवर कुरापती करताना दिसतो. हेच नाही तर पाकिस्तानमधून दहशतवादी भारतात पाठवून मोठे हल्ले घडवण्याचा कट कायमच पाकिस्तान करतो.

पाकिस्तान हादरला, भारताच्या त्या एका निर्णयाने उडाली झोप, सीमेवर तणाव, कोणत्याही क्षणी होऊ शकतो विनाश
India Pakistan border
| Updated on: Dec 31, 2025 | 10:36 AM

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने आपली ताकद अगोदरच पाकिस्तानला दाखवली. मात्र, यादरम्यान पाकिस्तानचे धाबे दणाणली असून कुरापती करण्याचे काम सध्या पाकिस्तानचे सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान देशाला प्रथमच प्रत्यक्ष ड्रोन हल्ल्याच्या धोक्याचा सामना करावा लागला. आता भारत हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी काम करत असून आपली ताकद वाढवत आहे. लढाऊ विमानांपासून ते क्षेपणास्त्रविरोधी आणि ड्रोनविरोधी प्रणालींपर्यंत विविध तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. मिशन सुदर्शन चक्र हा एक राष्ट्रीय हवाई संरक्षण कार्यक्रम आहे. भारतीय लष्कराकडून 8,000 ते 10,000 ड्रोन विकसित करण्याचे काम सुरू आहे. भारताच्या या नियोजनामुळे पाकिस्तानची झोप उडाली असून सध्या पाकडे अस्वस्थ आहेत. त्यामुळे मागून कुरापती करण्याचे काम सुरू आहे.

भारताच्या या निर्णयामुळे इस्लामाबाद घाबरला असून त्यांनी थेट चीनकडून ड्रोनविरोधी प्रणाली खरेदी करून जम्मू काश्मीर सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या लोकांच्या खर्चातून याकरिता कपात केली जाते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी, चेन्नईतील बिग बँग बूम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (BBBS) या संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीने आपली प्रवज्र सेंटिनेल अँटी-ड्रोन प्रणाली कर्तव्य पथावर तैनात केलीये.

भारतीय सैन्याचे उद्दिष्ट आहे की, 2027 पर्यंत प्रत्येक सैनिकाला ड्रोन चालवण्याचे मूलभूत प्रशिक्षण दिले जावे. आता सर्व सैन्यदल आणि सेवांमध्ये ड्रोन युनिट्सचा समावेश केला जात आहे. सैनिकांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. भारतीय लष्कराने हा अत्यंत मोठा निर्णय घेतल्याचे नक्कीच म्हणाव लागेल. देहरादून इंडियन मिलिटरी अकादमी, चेन्नई आणि गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, देवळाली येथील आर्टिलरी स्कूल यांचा समावेश आहे.

सैनिकांना नॅनो, मायक्रो, मध्यम आकाराचे ड्रोन चालवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. यामुळेच आता पाकिस्तानची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यादरम्यान पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केली होती. भारताने या हल्ल्याना प्रतिउत्तर दिले. हवेतच थेट पाकिस्तानचे ड्रोन फोडले. आता भारताकडून ड्रोन अधिक वापरण्यावर भर दिला जाईल.