रशियन सैन्याकडून लढणाऱ्या भारतीय नागरिकाला युक्रेनच्या लष्कराने केली अटक, हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल, मोठी..

रशिया-युकेन यांच्यातील युद्ध गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहेत. पुतिन युद्धातून मार्ग काढण्यासाठी थेट अमेरिकेला पोहोचले होते. मात्र, अजूनही युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे. नुकताच युक्रेनच्या सैन्याने भारतीय नागरिकाला अटक केलीये.

रशियन सैन्याकडून लढणाऱ्या भारतीय नागरिकाला युक्रेनच्या लष्कराने केली अटक, हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल, मोठी..
Sahil Mohammad Hussain
| Updated on: Oct 08, 2025 | 9:33 AM

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसतंय. नाटो देशांनीही या युद्धात थेट उडी घेतली. युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पुतिन यांनी म्हटले की, आम्ही फक्त युक्रेनसोबत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहे.  नाटो देश युक्रेनला युद्धासाठी मदत करत आहेत. दोनदा नाटोमध्ये समावेश व्हावा म्हणून आम्ही प्रस्ताव ठेवला. मात्र, आम्हाला नाटो देशांनी सदस्य बनवले नाही. आता एकटा रशिया सर्व नाटो देशांसोबत युद्ध लढत आहे. भारत आणि चीनवरही नाटो देशांसोबतच अमेरिकेचा मोठा दबाव रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून आहे. रशियाला कोंडीत पकडण्यासाठी भारतावर निर्बंध लादली जात आहेत.

भारताने काही दिवसांपूर्वीच रशियाला स्पष्ट म्हटले होते की, युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये त्यांनी भारतीय नागरिकांचा वापर करू नये. काही भारतीय नागरिकांचा समावेश रशियाने आपल्या लष्करात केला असून त्यांना युक्रेनविरोधात युद्ध लढण्यासाठी सैन्यात घेतले आहे. भारतीय नागरिकांनीही रशियाच्या सैन्यात सहभागी होऊ नये, असे स्पष्टपणे भारत सरकारने म्हटले, परिस्थिती अधिक वाईट असल्याने यापासून दूर राहण्यास सांगितले. आता युक्रेनियन सैन्याने चक्क 22 वर्षीय भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले आहे.

जो रशियाकडून युक्रेनविरोधात युद्ध लढत होता. हा 22 वर्षीय व्यक्ती मुळ गुजरातचा असल्याचे सांगितले जातंय. त्याचा व्हिडीओ युक्रेनच्या सैन्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. सूत्रांनी सांगितले की, कीवमधील भारतीय दूतावास या गोष्टीतील सत्यता पडताळत आहेत. युक्रेनियन आर्मीच्या 63 व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, अटक केलेल्या तरुणाचे नाव माजोती साहिल मोहम्मद हुसेन आहे.

तो मोरबी गुजरात येथील रहिवासी आहे. तो रशियातील एका विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी भारतातून आला होता. या व्हिडीओमध्ये तो रशियन भाषेत बोलताना दिसत असून त्याने म्हटले की, त्याला ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यासाठी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगात असताना, त्याला त्याची शिक्षा टाळण्यासाठी रशियन सैन्यात भरती होण्याची ऑफर देण्यात आली. त्याने ती स्वीकारली. मात्र, यादरम्यान त्याचा वाद रशियन सैन्यातील अधिकाऱ्यासोबत झाला आणि त्याने युक्रेनसमोर आत्मसमर्पण केले. भारतीय दूतावास याबद्दलची अधिक माहिती घेत आहेत.