AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकशाही जिंदाबाद! NCSL Summit मध्ये भारतीय आमदारांचा बुलंद आवाज, सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळाची अमेरिकेत एकच चर्चा

Indian Delegation in NCSL Summit : भारतातील 24 राज्यांतील 130 हून अधिक आमदारांनी अमेरिकेत लोकशाही जिंदाबादचा नारा दिला. अमेरिकन लोकांना भारतीय जिवंत लोकशाहीचे दर्शन झाले. NCSL च्या शिखर संमेलनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला.

लोकशाही जिंदाबाद! NCSL Summit मध्ये भारतीय आमदारांचा बुलंद आवाज, सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळाची अमेरिकेत एकच चर्चा
भारतीय आमदारांचा डंका
| Updated on: Aug 09, 2025 | 10:55 AM
Share

अमेरिकेत लोकशाहीचा आवाज बुलंद झाला. अमेरिकेतील बोस्टन शहरात नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (NCSL) पार पडली. त्यामध्ये भारतातील 24 राज्यातील 130 हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे शिष्टमंडळ ठरले आहे. भारताच्या विविधतेत एकतेचे जगाने येथे दर्शन घेतले. भारतीय शिष्टमंडळाने येथील विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाचे प्रतिनिधीत्व केले.

NLC भारताचे संस्थापक डॉ. राहुल कराड यांनी अमेरिकेतील या लोकशाही बळकटी करण्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हे केवळ शिष्टमंडळ नव्हते. तर भारतीय लोकशाहीची शक्ती आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतिक आहे. भारतातातील विविध राज्यातील कायदेमंडळातील हे प्रतिनिधी जगभरातील 7,000 हून अधिक प्रतिनिधींशी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), आरोग्य, वाहतूक आणि जागतिक प्रशासन यासारख्या विषयांवर संवाद साधत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी हे नवीन पर्व आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली.

Indian Delegation in NCSL Summit1

समिटमध्ये भारताचा दहशतवादाविरोधात आवाज

भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली. उत्तर प्रदेशमधील बांसगाव मतदारसंघातील भाजप आमदार विमलेश पासवान यांनी दहशतवादाविरोधात आवाज उठवला. गोळ्या आणि बंदुकीने दहशतवादाची भाषा सुरु होते. तर संवाद,सहअस्तित्व आणि धैर्याने मानवता समोर येते असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक मंचावर भारताने दहशतवादाविरोधात आवाज उठवला. भारतीय जनता पक्षाच्या विधायकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली. त्यात अमेरिकेतील बोस्टन येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (National Conference of State Legislatures) मध्ये जगाच्या सर्वात मोठ्या समस्येवर, दहशतवादावर भारताने आवाज उठवल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतातील 24 राज्यातील 130 हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी या समिटमध्ये सहभाग नोंदवला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.