Nimisha Priya : येमेनमधून आली मोठी बातमी, भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी टळली
Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाची सध्या फाशीची शिक्षा टळली आहे. निमिषा प्रियाला 16 जुलैला फाशी देण्याच निश्चित करण्यात आलं होतं. येमेनच्या जेलमध्ये बंद असलेल्या निमिषा प्रियावर बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीच्या हत्येचा आरोप आहे.

येमेनमधून भारतासाठी एक मोठी गुड न्यूज आली आहे. येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा टळली आहे. निमिषाच कुटुंब आणि पीडित तलाल अब्द महदीच्या कुटुंबात ब्लड मनीबद्दल अजून काही फायनल झालेलं नाही. सध्या फाशी टळल्याची सूचना तुरुंग प्रशासनाने दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निमिषा प्रकरणात ग्रांड मुफ्ती अबूबकर अहमद यांची पीडित अब्दो महदी कुटुंबासोबत चर्चा सुरु आहे. पहिल्यादिवसाची बोलणी सकारात्मक झाली. त्यामुळे पुढे सुद्धा चर्चा होऊ शकते. म्हणून फाशी टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येमेनच्या न्याय विभागाने याआधी तुरुंग प्रशासनाला 16 जुलै रोजी निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. निमिषावर बिझनेस पार्टनर अब्दो महदीच्या हत्येचा आरोप आहे.
2008 साली केरळमधून नोकरीसाठी निमिषा प्रिया येमेनमध्ये गेली होती. तिच्यावर अब्द महदीच्या हत्येचा आरोप आहे. निमिषा तेव्हापासून सना जेलमध्ये बंद आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या महिन्यातच तिला फाशी होणार होती. त्यानंतर निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न वेगाने सुरु झाले. निमिषा प्रिया इंटरनॅशनल काऊन्सिल नावाची एक संस्था बनवण्यात आली. ती ब्लड मनी जमा करण्यासाठी सक्रीय होती. येमेनच्या शरिया कायद्यानुसार पीडित कुटुंब पैसे स्वीकारुन दोषी व्यक्तीला माफ करु शकतं.
पडद्यामागे काय घडतय?
निमिषाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांपासून ग्रांड मुफ्ती अबूबकर अहमद आणि निमिषाच कुटुंब एक्टिव आहे. निमिषाची आई तर बऱ्याच काळापासून मुलीला वाचवण्यासाठी ठाण मांडून बसली आहे. केंद्र सरकारचा येमेनमध्ये दूतावासा नाहीय. मात्र तरीही निमिषाला वाचवण्यासाठी पडद्यामागून कुटनितीक प्रयत्न सुरु आहेत. याचा परिणाम दिसतोय. फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजे तूर्तास तिला दिलासा मिळाला आहे.
पती, मुलगी परतली पण निमिषा तिथे का थांबली?
निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी आहे. तिचं वय 38 वर्ष असून ती पेशाने नर्स आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती. ती कामासाठी आपल्या कुटुंबासोबत गेली होती. या दरम्यान येमेनमध्ये अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तिचा पती आणि मुलगी दोघे भारतात परतले. ते तीन वर्ष येमेनमध्ये राहिले. 2014 साली ते भारतात निघून आले. निमिषाने कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
