AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagdeep Singh: भारतीय वंशाच्या जगदीप सिंह यांना एलन मस्क यांच्या तोडीचं पॅकेज, अमेरिकेच्या कंपनीनं मोजली हजारो कोटींची रक्कम

गुगल, ट्विटर, आयएमएफ या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कंपन्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मोठी जबाबदारी देत आहेत.

Jagdeep Singh:  भारतीय वंशाच्या जगदीप सिंह यांना एलन मस्क यांच्या तोडीचं पॅकेज, अमेरिकेच्या कंपनीनं मोजली हजारो कोटींची रक्कम
जगदीप सिंह
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 20, 2021 | 1:06 PM
Share

नवी दिल्ली: गुगल, ट्विटर, आयएमएफ या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कंपन्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मोठी जबाबदारी देत आहेत. ट्विटरच्या साीईओपदी नुकतीच आयआटी मुंबईतून शिकलेल्या पराग अग्रवाल (Parag Agrawal ) यांची निवड करण्यात आली होती, त्यानंतर गीता गोपीनाथन (Geeta Gopinathan) यांची आयएमएफमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. आता भारतीय वंशाजे जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांना अमेरिकेतील कंपनीनं 17 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. जगदीप सिंह यांना देण्यात आलेलं पॅकेज हे अॅलन मस्कच्या तोडीचं आहे.

कोणत्या कंपनीनं दिली ऑफर

जगदीप सिंह हे भारतीय वंशाचे सीईओ असून त्यांना अमेरिकेतील बॅटरी बनवणाऱ्या क्वांटमस्केप कॉर्प या कंपनीनं 17 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. यानंतर माध्यमांमध्ये जगदीप सिंह यांच्या नावाची चर्चासुरु आहे. ही कंपनी केवळ एका वर्षापूर्वी स्थापन झालेली असून क्वाटमस्केप कॉर्प कंपनीचे संस्थापक सीईओ आहेत.

जगदीप सिंह यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार त्यांनी 2001 ते 2009 या काळात इनफिनेरा या संस्थेचे संस्थापक सीईओ म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी क्वांटमस्केप कॉर्प कंपनीची स्थापना केली होती. 2001 पूर्वी जगदीप सिंह अनेक कंपन्यांचे संस्थापक राहिलेले आहेत. त्यामध्ये lightera Networks, Airsoft या कंपनीमध्येही जगदीप सिंह यांनी काम केलं आहे. जगदीप सिंह यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं. कॅलिफोर्निया विद्यापीठ, मेरिलँड कॉलेज विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतलंय.

क्वांटमस्केप कॉर्प बड्या कंपन्यांची गुंतवणूक

बिल गेटस यांच्या वेंचर फंड आणि वॉक्सवॅगननं क्वांटमस्केप कॉर्पमध्ये गुंतवणूक केली आहे. क्वांटम स्केप कॉर्प आता नव्या पिढीच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. जगभरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळं क्वांटम स्केप कॉर्प ही कंपनी लीथियम आयन बॅटरीला किफायतशीर किमतीमधील पर्याय देण्याचं काम करत आहे.

इतर बातम्या:

सोयाबीनचे तेच कापसाचे, दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम? हा आहे मधला मार्ग

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा डाव होता, राऊतांचा गंभीर आरोप; संदर्भ नेमका काय? वाचा सविस्तर

Indian origin Jagdeep Singh who is ceo of QuantumScape Corp and his salary package is more than 17 thousand crore rupees

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...