AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे चित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धक्कादायक, पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट… पाकिस्तानही टेन्शनमध्ये…

पंतप्रधान नरेंद्र मोदा आणि पुतिन हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. सध्या चीनमधील घडामोडींवर जगाच्या नजरा आहेत. तीन बलाढ्य देश अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर मोठा दबाव अमेरिकेला असतानाच मोठा संदेश अमेरिकेला भारत आणि रशियाने दिला आहे.

हे चित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धक्कादायक, पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट... पाकिस्तानही टेन्शनमध्ये...
Narendra Modi and Vladimir Putin
| Updated on: Sep 01, 2025 | 12:08 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर असून त्यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये काही वेळ बैठक झाली आणि महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत आणि चीनच्या नात्यावर तिसऱ्या देशाने लेंसने बघण्याची गरज नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग हे 31 व्या एससीओ शिखर संमेलनमध्ये सहभागी झाले आहेत. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जपानची यात्रा केली. यावेळी त्यांनी काही महत्वाचे करार केले. जपानच्या यात्रेवरून आल्यानंतर लगेचच मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या विरोधात रणनीती आखली जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर गंभीर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो चीनमधील बैठकीपूर्वीचा पुढे आला आहे. हा फोटो पाहून डोनाल्ड ट्रम्प यांचा भडका उडणार हे नक्की आहेत. नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी या फोटोच्या माध्यमातून जगाला अत्यंत मोठा संदेश दिला आहे. दोन्ही महासत्ता देशाचे नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले.

या फोटोच्या माध्यमातून जगाला आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा संदेश मोदी आणि पुतिन यांनी दिला आहे. SCO शिखर परिषदेत 2025 भारताला मिळालेल्या मोठ्या यशानंतर संपूर्ण जगाच्या नजरा पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या भेटीवर खिळल्या आहेत. दोन्ही नेते एकाच गाडीतून द्विपक्षीय चर्चेच्या ठिकाणी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा फोटो शेअर केला आहे. दोन्ही देशातील मैत्री या फोटोच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसते. पाकिस्तानचेही टेन्शन या फोटोमुळे वाढले असावे.

रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका भारतावर सातत्याने दबाव टाकत आहे. याचाच एका भाग म्हणजे अमेरिकेने भारतावर तब्बव 50 टक्के टॅरिफ लावले आहे. असे असले तरीही भारताने रशियाची साथ सोडली नाहीये. SCO शिखर परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेच्या विरोधात भारत, रशिया आणि चीन एकत्र येताना दिसत आहेत. यासोबतच पाकिस्तानला देखील मोठा संदेश देण्यात आलाय.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा