मोदी, पुतिन, जिनपिंग एकत्र येताच ट्रम्प सरकारला मिरच्या झोंबल्या, थयथयाट सुरू, भारताबद्दल थेट…
भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेच्या विरोधात अनेक देश एकत्र येत आहेत. त्यामध्येच भारत, रशिया आणि चीनच्या बैठकीतील फोटो पुढे आल्याने अमेरिकेचा थयथयाट सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. परत एकदा भारताबद्दल धक्कादायक विधान अमेरिकेकडून करण्यात आलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारताने शेवटपर्यंत टॅरिफचे संकट टाळण्यासाठी प्रयत्न केली. मात्र, मार्ग निघू शकला नाही. अमेरिकेच्या दबावाखाली न येता भारत हा पर्याय शोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर गेले होते. त्यानंतर ते सध्या चीनच्या दाैऱ्यावर आहेत. यासोबतच भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताने थेट रशिया दाैरा करत महत्वाचे करार केली. मोदी, पुतिन, जिनपिंग हे तिन्ही देशांचे नेते एकाच मंचावर आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगाची आग उठलीये. परत एकदा भारताबद्दल धक्कादायक विधान त्यांच्या सल्लागाराने केले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले की, भारत हा युक्रेन युद्धासाठी पैसा पुरवत आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारत हा युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू ठेवत आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरू होण्याच्या अगोदर भारत हा खूप कमी तेल रशियाकडून खरेदी करत. आता असे काय झाले की, भारतातील मोठ्या तेल कंपन्या या रशियाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. मुळात म्हणजे रशियाच्या तेलातून भारत हा मोठा पैसा कमावत आहे.
पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कच्च्या तेलामध्ये मोठी सूट देत आहेत. या तेलाला रिफाईन करून भारत हा युरोप, आफ्रिका, एशिया भागात विकत आहे आणि मोठा पैसा कमावत आहे. भारत कपडे धुण्याच्या मशिनपेक्षा वेगळे काहीच नाही. या पैशातून रशिया हे युक्रेनच्या लोकांचा जीव घेत आहे. ही पहिली वेळ नाही की, पीटर यांनी भारताबद्दल असे विधान केले असावे. यापूर्वीही अनेकदा पीटरने भारताबद्दल असेच धक्कादायक विधाने केली आहेत.
अमेरिकेच्या विरोधात अनेक देश एकवटताना दिसत आहेत. भारत, रशिया आणि चीन हे एकाच मंचावर आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप झाला आहे. काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेला रशियाच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवायचे आहेत. मत्र, अमेरिकेला हे माहिती आहे की, जोपर्यंत भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करत नाही, तोपर्यंत हे अजिबातच शक्य नाही.
