टॅरिफच्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काैतुकांचा वर्षाव, अभिनंदन करत…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करत त्यांचे काैतुक केले आहे. भारत आणि अमेरिकेत मागील काही दिवसांपासून मोठा तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. ज्याला भारताने विरोध केला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक केले.

टॅरिफच्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काैतुकांचा वर्षाव, अभिनंदन करत...
Prime Minister Narendra Modi and Donald Trump
| Updated on: Oct 04, 2025 | 8:43 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाच्या शांततेसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मुस्लिम देशांनी एकत्र घेऊन तयार करण्यात आला. इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेला गेले आणि त्यांनी या प्रस्तावाला सहमती दिली. हमासला हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी 72 तासांचा वेळ दिला. हमासने देखील हा प्रस्ताव मंजूर केल्याने आता गाझा पट्टी शांत होणार हे नक्की. अमेरिकेने इस्त्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी 20 कलमी खास प्रस्ताव मांडला. ज्याला फक्त इस्त्रायल आणि हमासच नाही तर जगातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुकही केले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 कलमी प्रस्तावाला भारताने देखील पाठिंबा दिला होता. आता इस्त्रायल-हमास या दोघांनीही हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक करत म्हटले की, आम्ही गाझातील शांती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतो. बंधकांना सोडून देण्याचे संकेत अत्यंत महत्वपूर्ण नक्कीच आहेत. भारत टिकावू आणि न्यायाच्या शांतीच्या प्रयत्नांसाठी समर्थन करतो.

हमास-इस्त्रायलच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प  यांनी 20 कलमी प्रस्ताव ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रस्तावाचे समर्थन केले होते आणि आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असल्याचे थेट म्हटले. भारतासह अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. शेवटी अनेक दिवसांनंतर गाझामध्ये शांतीचे मोठे संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, त्यांनी जगातील सात युद्ध रोखली.

इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाच्या प्रस्तावानंतर डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांती पुरस्कारासाठी दावा करतील, असे सांगितले जातंय. भारत-पाकिस्तान युद्धात आपणच मध्यस्थी केल्याचे वारंवार डोनाल्ड ट्रम्प सांगताना दिसतात. मात्र, दरवेळी भारताने हे स्पष्ट केले की, कोणत्याही देशाचा यामध्ये हस्तक्षेप नव्हता. भारत-पाकच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यामधून मार्ग काढलाय.