डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा जगासमोर, पाकिस्तानने झटकले हात, गंभीर आरोप करत…
डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीकता मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढल्याचे बघायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला धमकावत असताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख अमेरिकेतून भारताला परमाणू हल्ल्याची धमकी देताना दिसले. आता पाकिस्तानने मोठी पलटी मारलीये.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाच्या शांततेसाठी एक प्रस्ताव ठेवला आणि तो इस्त्रायलसह हमासने देखील मंजूर केला. ट्रम्प यांनी हा प्रस्ताव मुस्लिम देशांना एकत्र घेऊन तयार केला. यादरम्यानच अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांची भेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आणि लष्करप्रमुखांनी घेतली. ट्रम्प यांनी म्हटले होते की, गाझाच्या शांततेच्या प्रस्तावाला पाकिस्तानने पाठिंबा दिला. इस्त्रायलने लगेचच हा प्रस्ताव मंजूर केला. हमासने काही वेळ याकरिता घेतला. ट्रम्प यांना सर्वाधिक विश्वास असलेल्या पाकिस्ताननेच त्यांना अत्यंत मोठा धक्का दिला. ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेबद्दल हमासने सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे आणि त्यानी जवळपास सर्व प्रमुख अटी मान्य करण्यास सहमती दर्शविली आहे.
हमासने देशी सकारात्मक भूमिका घेतली असली तरीही पाकिस्तानने यादरम्यान ट्रम्प यांची साथ सोडल्याचे बघायला मिळाले. पाकिस्तानने ट्रम्प यांच्या 20 कलमी गाझा शांती प्रस्तावाबद्दल धक्कादायक विधान केले. पाकिस्तानचे उपप्रधानमंत्री आणि विदेश मंत्री इशाक डार यांनी थेट म्हटले की, ट्रम्प यांनी मांडलेली कागदपत्रे आमची नाहीत. काही गोष्टींमध्ये मोठे बदल आहेत.
डार यांनी संसदेत बोलताना हे म्हटले. पाकिस्तानने अमेरिकेच्या प्रस्तावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एकीकडे पाकिस्तानातून या प्रस्तावाच्या मुद्यातून अमेरिकेवर गंभीर आरोप केली जात असतानाच आता हमासने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. डारने म्हटले की, अमेरिकेव्दारे घोषित शांती योजना 20 कलमी प्रस्ताव आणि मुस्लिम देशांनी मिळून केलेला प्रस्ताव वेगळा आहे. आमची ती कागदपत्रे नाहीत, जी अमेरिकेने मांडली आहेत.
या 20 कलमी प्रस्तावामध्ये जे संशोधन केली गेली आहेत, ती आमच्या सहमतीने करण्यात आली नाहीत. पाकिस्तानने हा अत्यंत मोठा दावा केला असून थेट अमेरिकेवरच गंभीर आरोप केली आहेत. पाकिस्तानने केलेल्या दाव्यानंतरही हमासने प्रस्ताव मंजूर केला. अमेरिकेने हमासला हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 72 तासांचा वेळ दिला होता. हमास हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी वेळ घेताना दिसला. अनेक दिवसांपासूनचा हा संघर्ष आता अमेरिकेमुळे थांबण्याचे मोठे संकेत आहेत.
