AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ T20 WC 2026 Final : मिसाइल, ड्रोन हल्ल्याचा धोका असूनही भारतीयांनी जीव धोक्यात टाकला पण टीम इंडियाचा…

IND vs NZ T20 WC 2026 Final : सध्या मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरु आहे. इराणकडून आखाती देशांवर हल्ले होत आहेत. या युद्ध काळात एक वेगळा फोटो समोर आलाय. टीम इंडियाने काल न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला.

IND vs NZ T20 WC 2026 Final : मिसाइल, ड्रोन हल्ल्याचा धोका असूनही भारतीयांनी जीव धोक्यात टाकला पण  टीम इंडियाचा...
IND vs NZ Match Watching in UAEImage Credit source: Screengrab
| Updated on: Mar 09, 2026 | 10:08 AM
Share

सध्या मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु आहे. इराणकडून इस्रायलसह आखाती देशांवर मिसाइल, ड्रोन हल्ले सुरु आहेत. या युद्ध काळात एक वेगळा फोटो समोर आलाय. इराणकडून यूएईवर मिसाइल, ड्रोन हल्ले सुरु आहेत. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांवर इराणकडून हल्ले होत आहेत. मात्र, हा धोका असूनही यूएईमध्ये भारतीयांनी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी20 फायनल मॅचचा आनंद घेतला. यावेळी भारतीयांच्या मनात मिसाइल किंवा ड्रोन हल्ल्याची भिती अजिबात दिसली नाही. उलट न्यूझीलंड विरुद्ध फायनल मॅचचा उत्साह त्यांच्यामध्ये होता. मोठ्या संख्येने भारतीय एकत्र जमून हा सामना पाहत होते. मिडिल ईस्टमध्ये तणाव असला तरी आम्हाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरक्षित वाटतय असं भारतीय समुदायाच्या लोकांनी सांगितलं. मोठ्या संख्येने भारतीय एकत्र जमले व त्यांनी टीम इंडियाचं समर्थन केलं.

रविवारी दुबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये आणि सामुदायिक हॉलमध्ये भारतीयांनी मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्याचं आयोजन केलं होतं. क्रिकेट प्रेमींनी तिरंगा फडकवत टीम इंडियाच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. मॅचचा आनंद घेतला. यावेळी वातावरणात उत्साह आणि देशभक्तीचा रंग होता. मिडिल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आहे. हल्ले सुरु आहेत. त्या परिस्थिती अशा प्रकारचं आयोजन चर्चेचा विषय बनलं आहे. या क्षेत्रामध्ये संघर्ष असला तरी संयुक्त अरब अमीरातमध्ये परिस्थिती सामान्य आहे, असं इथे राहणाऱ्या भारतीयांनी सांगितलं. इथे आम्हाला सुरक्षित वाटतय असं त्यांचं म्हणणं आहे.

इराणी ड्रोन्सना हवेतच संपवलं

यूएई प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली आहे. लोकांना अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही असं भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींनी सांगितलं. दुबई हे आर्थिक प्रगतीचं तसच सुरक्षित, स्थिर शहर मानलं जातं. इराणचे अनेक ड्रोन्स आणि मिसाइल हल्ले यूएईने परतवून लावले आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी करुन देशाची एअर डिफेन्स प्रणाली आणि सैन्याचे हॅलिकॉप्टर्स इराणी ड्रोन्सना हवेतच संपवत असल्याचं दिसत आहे.

Follow Us
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच