Operation Sindoor : एअर स्ट्राईक होताच पाकिस्तानी चोरून चोरून गुगलवर काय सर्च करायला लागले? भीती कशाची?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानी नागरिक गुगलवर "ऑपरेशन सिंदूर," "इंडिया अटॅक," आणि "सिंदूरचा अर्थ" असे शब्द शोधत आहेत. भारताच्या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याच्या आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Operation Sindoor : एअर स्ट्राईक होताच पाकिस्तानी चोरून चोरून गुगलवर काय सर्च करायला लागले? भीती कशाची?
एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी चोरून गुगलवर काय सर्च करत आहेत ?
Image Credit source: TV9 Gujrati
| Updated on: May 07, 2025 | 1:05 PM

भारतीय सैन्याने अखेर पहलगामचा बदला घेतला आहे. आधी अश्रूंचा बदला पाण्याने घेतल्यानंतर काल मध्यरात्रीच भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर धुवांधार एअर स्ट्राईक केली. त्यामुळे दहशतवाद्यांची तळंच उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा आका मसूद अजहरचं कुटुंबही ठार झालं आहे. त्याचे भाऊ आणि बहीणही वाचू शकले नाहीत. भारताने कोणतीही सीमारेषा न ओलांडता अत्यंत शांतपणे अतिरेक्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. भारताच्या या हल्ल्याने स्वत: दहशतवाद्यांचा आका मसूद अजहर हादरून गेला आहे. तो अक्षरश: रडला. तर पाकिस्तानी नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी आता थेट गुगलवर एक महत्त्वाची गोष्ट शोधण्यास सुरुवात केली आहे.

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करताना या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. आता हे ऑपरेशन सिंदूर काय आहे याचा शोध पाकिस्तानी नागरिक घेत आहेत. पाकिस्तानी नागरिक गुगलवर आपरेशन सिंदूर बाबतची माहिती शोधत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील सर्चिंग इतकं वाढलं की पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर गुगलवर ट्रेंड होत आहे.

हे शब्द सर्च केले जातायेत

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ अड्डे नेस्तनाबूत केली आहेत. या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण आहे. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याने पाकिस्तान हादरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक ऑपरेश सिंधूची माहिती घेताना दिसत आहेत. पाकिस्तानी नागरिक गुगलवर काही शब्द सातत्याने शोधत आहेत. ऑपरेशन सिंदूर, इंडिया ऑपरेशन सिंदूर, सिंदूर अटॅक ऑपेरशन सिंदूर काय आहे? हे शब्द पाकिस्तानात गुगलवर सर्च केले जात आहेत. या शिवाय सिंदूरचा अर्थ काय होतो त्याचीही माहिती गुगलवरून घेतली जात आहे. सिंदूर म्हणजे किवर्ड्स सर्च केले जात आहे. सामान्य नागरिकांपासून ते मीडियातील कर्मचाऱ्यांपर्यंत पाकिस्तानातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर सध्या ऑपरेशन सिंदूरच सर्च करताना दिसत आहे.

भारताविषयी सर्चिंग

याशिवाय ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लोक भारताबाबत सर्च करत आहेत. गुगल ट्रेंड्सच्या रिपोर्टनुसार, India Attack Bahawalpur, India Attack on Pakistan Today, India Attack on Bahawalpur, India Attacked on Pakistan, India Strikes Pakistan आदी शब्द पाकिस्तानी लोक सर्च करून माहिती घेत आहेत. याशिवाय पाकिस्तानातील लोक पाकिस्तानी आर्मी आणि इंडियन आर्मी विषयीही सर्च करत आहेत.