AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indonesia News : ज्वालामुखीचा तांडव! राख आकाशात 50000 फुटांवर, 200 हून अधिक उड्डाणे रद्द

इंडोनेशियात ज्वालामुखीचा तांडव पाहायला मिळत आहे. राख आकाशात 50000 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Indonesia News : ज्वालामुखीचा तांडव! राख आकाशात 50000 फुटांवर,  200 हून अधिक उड्डाणे रद्द
VolcanoImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 2:16 PM
Share

प्रमोद उगले : इंडोनेशियातील प्रसिद्ध ‘अनाक क्राकाटोआ’ ज्वालामुखीचा ६ सप्टेंबर रोजी अत्यंत भीषण उद्रेक झाला आहे. त्यातून निघालेली राख आणि धूर आकाशात 50000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर पसरला आहे. हवेतील ज्वालामुखीय राखेच्या धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने जकार्ताच्या सोएकॉर्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एकूण २०९ उड्डाणे (Flights) रद्द करण्यात आली आहे. तसेच काही उड्डाणे लांबणीवर किंवा इतरत्र वळवण्यात आली आहेत.

अचानक उड्डाणे रद्द झाल्याने राजधानी जकार्ताच्या सोएकॉर्नो-हट्टा विमानतळावर हजारो आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी अडकून पडले आहेत. उड्डाणांचे पुनर्नियोजन करण्यासाठी आणि परतावा मिळवण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने ज्वालामुखीच्या राखेमुळे विमानांच्या इंजिनांना होणारा धोका लक्षात घेऊन संबंधित हवाई क्षेत्रासाठी ‘रेड एव्हिएशन वॉर्निंग’ (Red Aviation Warning) जारी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने ज्वालामुखीच्या ५ किलोमीटरच्या परिघातील सर्व मानवी उपक्रम थांबवले आहेत. तसेच स्थानिक रहिवाशांना राख आणि विषारी वायूपासून बचावासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्या देशात जाणारी उड्डाणे रोखली?

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जकार्ताच्या सोएकॉर्नो-हट्टा विमानतळावर सकाळी 5.30 पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहे. ज्वालामुखीची राख ही जकार्तामध्ये पसरली आहे. त्यामुळे तेथील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे धावपट्टीवर जवळपास 170 विमाने उभी आहेत. या निर्णयाचा 23000 प्रवाशांना फटका बसला आहे. काही प्रवाशांनी तिकीटाचे पैसे पुन्हा मागितले आहेत. तर काहींनी त्यांचा प्रवास पुढे ढकलला आहे. सिंगापूरमध्ये जाणारी विमाने मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आली आहे. तसेच हॉककाँग, सिडनी, एम्स्टर्डम, सियोल, दोहाच्या दिशेने जाणारी उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ज्वालामुखीचा उद्रेक हा 2018 साली देखील झाला होता. त्यावेळी 430 जणांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातील काही भागात ज्वालामुखीमुळे राख पसरली आहे. या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने लोकांना ज्वालामुखीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ज्या भागातील परिसरात हवेत राख पसरली आहे, त्या भागातील लोकांना मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी झाकून ठेवण्यास सांगितले. ज्या नागरिकांच्या डोळ्याची आग होत आहे, त्यांना तातडीने रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Follow Us
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ