Indonesian Marriage : वराचे वय 74, वधू फक्त 24 वर्षांची, हुंडा दिला दीड कोटी, अजब लग्नाची जगात चर्चा!

सध्या संपूर्ण जगात एका अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे. या लग्नात नवऱ्या मुलाचे वय तब्बल 74 वर्ष आहे. तर नवरी फक्त 24 वर्षांची आहे. त्यांच्या वयात तब्बल 50 वर्षांचा फरक असल्याने हे लग्न सध्या चर्चेत आहे.

Indonesian Marriage : वराचे वय 74, वधू फक्त 24 वर्षांची, हुंडा दिला दीड कोटी, अजब लग्नाची जगात चर्चा!
indonesian marriage
| Updated on: Oct 20, 2025 | 9:26 PM

Viral Indonesian Marriage : लग्न हा आयुष्यातील फार महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणूनच हा क्षण संस्मरणीय राहावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही कपल्स आलिशान असा लग्नसोहळा आयोजित करतात. तर काही लोक एखाद्या अनोख्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करतात. अशा काही लग्नांची विशेष चर्चा होत असते. काही लग्न तर काही अजब कारणांमुळे चर्चेत येतात. पुढच्या अनेक दिवस या लग्नांची चर्चा होते. सध्या अशाच एका अनोख्या लग्नाविषयी जगभरात बोलले जात आहे. या लग्नासाठी नवऱ्या मुलाने तब्बल होणाऱ्या बायकोला तब्बल 1.8 कोटी रुपये हुंडा म्हणून दिले आहेत. विशेष म्हणजे या लग्नातील नवऱ्या मुलाचे वय तब्बल 74 वर्ष आहे.

नेमके प्रकरण काय?

हे लग्न इंडोनेशिया देशातील आहे. इथे एका 74 वर्षीय म्हाताऱ्या माणसाने फक्त 24 वर्षांच्या तरुण मुलीशी लग्न केले आहे. याच लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या अनोख्या लग्नात नवऱ्या मुलाने मुलीला साधारण 1.8 कोटी रुपये ब्राईड प्राईस (हुंडा) दिली आहे. या दोघांच्याही वयामध्ये तब्बल 50 वर्षांचा फरक आहे. त्यामुळेच हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे.

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनाही दिली भेट

मिळालेल्या माहितीनुसार एक ऑक्टोबर रोजी पूर्वी जावा येथील पचितन रेजन्सी येथे हा विवाह पार पडला आहे. या लग्नातील नवऱ्या मुलाचे नाव तारमान तर वधूचे नाव शेला अरिका असे आहे. तारमान यांनी या लग्नाच्या सोहळ्यातच तब्बल तीन अब्ज रुपिये (इंडोनेशियन चलन) हुंडा म्हणून देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या भव्य विवाह सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांनाही पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी प्रत्येकाला रोख 6 हजार रुपये देण्यात आले. अगोदर नवऱ्या मुलाने वधूला हुंडा म्हमून 60 लाख रुपये देण्याचे ठरवले होते. मात्र लग्नासोहळ्यादरम्यान ही रक्कम 1.8 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.

कपल गेले हनिमूनला

हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर फोटोग्राफी टीमने नवऱ्या मुलाने आमची फी दिलेली नाही, असा आरोप केला. तसेच हा 74 वर्षीय नवरा वधू पक्षाकडून आलेल्या एका व्यक्तीची दुचाकी घेऊन पळून गेल्याचेही बोलले जात होते. या सर्व चर्चांचे खंडन करत वराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या बायकोसोबत आहे. मी अजून तिच्याशी घटस्फोट घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण दिले. तसेच वराच्या कुटुंबीयांनी दे दोघेही खुश असून हनीमुनला गेले आहेत, असे सांगितले आहे. दरम्यान, सध्या हे लग्न जगभरात चर्चेचा विषय ठरले असून या लग्नाविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.