Iran-US Tension : छोट्याशा इराणने बलाढ्य अमेरिकेला पुन्हा ललकारलं, कुठला मूर्खपणा केलात तर…

Iran-US Tension : सैन्य तयारीसह इराणने कूटनितीक आघाडीवर हालचाली वाढवल्या आहेत. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली.

Iran-US Tension : छोट्याशा इराणने बलाढ्य अमेरिकेला पुन्हा ललकारलं, कुठला मूर्खपणा केलात तर...
Iran Supreme Leader
| Updated on: Feb 02, 2026 | 4:23 PM

अमेरिकेसोबत टोकाचा तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने सैन्य आणि कूटनितीक दोन्ही आघाड्यांवर आपली सक्रीयता वाढवली आहे. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स एअरोस्पेस फोर्सच्या वरिष्ठ कमांडरने इराणी संसदेच्या नॅशनल सिक्योरिटी आणि फॉरेन पॉलिसी कमिटीला ब्रीफिंग दिली. यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलय की, इराणची वॉर रुम पूर्णपणे एक्टिव आहे. कुठल्याही क्षणी शत्रुने हल्ला केल्यास त्याला उत्तर द्यायला तयार आहे. त्याशिवाय इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली.

संसदीय समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांच्यानुसार, रविवारच्या बैठकीत कमांडरने क्षेत्रीय स्थिती, सैन्य तैनाती आणि विद्यमान सुरक्षा स्थितीतवर विस्तृत माहिती दिली. संभाव्य संघर्षाचा सामना करण्यासाठी सर्व ऑपरेशनल प्लान तयार आहे. कुठल्याही हल्ल्याला थेट युद्धक्षेत्रात उत्तर दिलं जाईल.

ते सर्व आमच्या ऑपरेशन रेंजमध्ये

“शत्रुच्या गोटातील माहिती मिळवण्यात इराण पुढे आहे. अमेरिकेसह विरोधकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. ब्रीफ्रिंगमध्ये हा सुद्धा इशारा देण्यात आलाय की, अमेरिकेने मूर्खपणाचं कुठलं पाऊल उचललं, इराणवर हल्ला केला, तर ते स्वत:ला क्षेत्रीय युद्धात अडकवून घेतील. संपूर्ण क्षेत्रात असलेलं अमेरिकन सैन्य आणि त्यांचं आर्थिक हित इराणच्या ऑपरेशनल रेंजमध्ये आहे” असा रेजाईने कमांडरच्या हवाल्याने दावा केला.

त्यापेक्षा जास्त क्षमता त्यांच्याकडे आहे

बैठकीत इराणची सध्याची मिसाइल क्षमता आणि आक्रमक सैन्य ताकद यांचा रिपोर्ट सादर करण्यात आला. जून 2025 मध्ये झालेल्या 12 दिवसाच्या युद्धानंतर इराणची सैन्य क्षमता आणखी मजबूत झालीय, असा दावा आहे. आतापर्यंत इराणची जितकी ताकद दाखवलीय. त्यापेक्षा जास्त क्षमता त्यांच्याकडे आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये धमक्यांचा खेळ

सैन्य तयारीसह इराणने कूटनितीक आघाडीवर हालचाली वाढवल्या आहेत. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली. या चर्चेमध्ये क्षेत्रीय, आंतरराष्ट्रीय स्थित खासकरुन अमेरिकेची भूमिका आणि संभाव्य धोक्याचा विचार करण्यात आला. सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये धमक्यांचा खेळ सुरु आहे. अमेरिकेने युद्धाचं पाऊल उचलल्यास संपूर्ण क्षेत्र या युद्धामध्ये ओढलं जाईल अशा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांनी दिलाय.