होर्मुज खाडीच्या संकटात भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, इराणने घेतला थेट मोठा निर्णय, भारतीय..

होर्मुज खाडीत मोठा तणाव बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनले. त्यामध्येच आता भारतासाठी इराणमधून मोठी बातमी पुढे येत आहे. शेवटी इराणला भारतापुढे झुकावेच लागल्याचे दिसतंय.

होर्मुज खाडीच्या संकटात भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, इराणने घेतला थेट मोठा निर्णय, भारतीय..
Iran and India
| Updated on: May 27, 2026 | 11:47 AM

होर्मुज खाडी गेल्या अडीच महिन्यापेक्षा अधिक काळापासून ठप्प आहे. जहाजांची ये-जा बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग संकटात आहे. जागतिक बाजार अस्थिर झाला. होर्मुज खाडीत भारताच्या अनेक जहाजांवर हल्ला झाला. भारताचे जहाज बुडवण्यात आले. फक्त भारतच नाही तर इतर देशांच्या जहाजांवर हल्ला झाला. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्यानंतर अमेरिकेनेही इराण भोवती मोठी तटबंदी केली. यादरम्यानच आता भारताला आनंदी देणारी बातमी पुढे आली. भारताच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. इराणमध्ये अटकेत असलेल्या दहा भारतीय खलाशांची अखेर सुटका करण्यात आली. भारताच्या राजनैतिक प्रयत्नांनंतर हे एक मोठे यश आहे. इराणसोबत सतत चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर अखेर

भारत सरकारने केलेल्या अथक राजनैतिक प्रयत्नांनंतर हे एक मोठे यश आहे. एका प्रदीर्घ वाटाघाटीच्या प्रक्रियेनंतर या खलाशांची सुरक्षित सुटका शक्य झाली. हा भारताचा मोठा विजय म्हणावा लागेल. खलाशांची सुरक्षित सुटका करण्याकरिता भारत अथक प्रयत्न करत होता. शेवटी इराणने भारताचे म्हणणे ऐकत एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला.

भारतीय नौवहन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, हे खलाशी एमव्ही हार्बर फिनिक्स या तेलवाहू जहाजावर तैनात होते. जुलै 2025 मध्ये ही घटना घडली होती. इराणच्या जास्त बंदराजवळ हे जहाज अडवण्यात आले. त्यानंतर जहाजावरील खलाशांना ताब्यात घेतले.  नौवहन महासंचालनालयाने एक निवेदन जारी करून सांगितले की, खलाशांना आता सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे आणि त्यांना भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे.

भारत सरकारने शांतपणे खलाशांना परत आणण्याकरिता तयारी सुरू केली. इराण आणि भारत यांच्यातील संबंध यामुळे मजबूत होतील. खाडी देशामध्ये मोठे युद्ध पेटले आहे. अमेरिका आणि इराण दोन्ही देश भारताच्या जवळ असल्याने भारताने या युद्धात सावध भूमिका घेतली. भारतीय जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यादरम्यान भारताने कडक शब्दात त्याची निंदा केली होती. हेच नाही तर होर्मुज खाडीत अडकलेल्या भारतीय जहाजांना सुरक्षा कधी देता येईल, याकरिताही प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us