AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण

Iran vs US : इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या सुमारे 180 ड्रोन नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इराणी सैन्याने अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ फायटर जटेवरही हल्ला केला असल्याचे इराणने म्हटले आहे.

इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
iran big clain says us 180 drone and fighter jet destroyed by iran army Image Credit source: Google
| Updated on: Apr 19, 2026 | 5:43 PM
Share

इराण आणि अमेरिकेत जवळपास 50 दिवस भीषण युद्ध झाले, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले करण्यात आले. अशातच आता या युद्धात इराणने अमेरिकन सैन्याची झोप उडवली असल्याचे समोर आले आहे. इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या सुमारे 180 ड्रोन नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इराणी सैन्याने अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ फायटर जटेवरही हल्ला केला असल्याचे विधान इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केले आहे. हा इराणच्या वाढत्या लष्करी क्षमतेचा पुरावा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इराणच्या या दाव्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटले की, इराणी सैन्याने F-35 वर केलेला हल्ला हा एकदाच घडलेला प्रकार नसून तांत्रिक आणि डिझाइन क्षमतांमुळे केलेली सुनियोजित कारवाई होती. F-35 जवळ पडलेल्या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला इराणच्या क्षमतेची जाणीव झाली आहे आणि तो कोणत्या दिशेने प्रगती करत आहे हेही स्पष्ट झाले आहे. इराणच्या संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दाखवण्यासाठी ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणली गेली. अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी मागील महिन्यात मान्य केले होते की इराणी गोळीबारामुळे नुकसान झाल्यानंतर F-35 जेटला आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती.

इराण वरचढ ठरला

इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी पुढे बोलताना म्हटले की, पाश्चात्य देशांकडून दबाव आणि धमक्या देण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. शत्रू चेतावण्या आणि वेळेच्या मर्यादा ठरवून आपले उद्दिष्ट साध्य करू शकला नाही, त्यामुळे आता मध्यस्थांच्या माध्यमातून संदेश पाठवत आहे. दोन्ही बाजूंचे उद्देश वेगवेगळे होते. अमेरिकेसोबतच्या चर्चेत काही मुद्द्यांवर सहमती झाली असली तरी अनेक मुद्द्यांवर अजूनही गंभीर मतभेद कायम आहेत. इराणने आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी धोरणात्मक पाऊल म्हणून युद्धविराम स्वीकारला, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तो मान्य केला कारण रणांगणात इराण वरचढ ठरला होता.

डोनाल्ड ट्रम्प अपयशी

गालिबाफ पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रंप इराणमध्ये सत्ताबदल घडवून आणण्यात आणि त्याच्या आक्रमक तसेच क्षेपणास्त्र क्षमतांना नष्ट करण्यात अपयशी ठरले. इराण व्हेनेझुएलासारखा नाही आणि अमेरिकन प्रशासन इराणची संरक्षण व्यवस्था खंडित करू शकले नाही. यावरून स्पष्ट होते की इराण आपल्या लष्करी क्षमतांबद्दल अभिमान बाळगतो आणि त्याचा कूटनीतिक फायद्यासाठी वापर करत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...