AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : इराणमध्ये मोसादच्या अंडर कव्हर एजेंट्सची वाट लागली, आतापर्यंत किती जणांना फाशी? किती जणांना अटक?

Iran Israel War : इराणमध्ये मोसादचे अंडर कव्हर एजेंट्स मोठ्या संकटात सापडले आहेत. जरासा जरी संशय आला, तर त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. या लढाईत इराणच मोठ रणनितीक नुकसान झालं आहे. कारण या लढाईत इस्रायलने इराणला आतून हादरवून सोडलय.

Iran Israel War : इराणमध्ये मोसादच्या अंडर कव्हर एजेंट्सची वाट लागली, आतापर्यंत किती जणांना फाशी? किती जणांना अटक?
Iran Israel War
| Updated on: Jun 25, 2025 | 1:19 PM
Share

बारा दिवसाच्या युद्धानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने इराण-इस्रायलमध्ये सीजफायर झालं आहे. पण तणाव कमी झालेला नाही. इराणमध्ये इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या नेटवर्कवर मोठी कारवाई सुरु आहे. बारा दिवसांच्या या लढाईत इराणच मोठ रणनितीक नुकसान झालं आहे. इस्रायलला हे फक्त मोसादमुळे शक्य करता आलं. मोसादच्या एजंट्सनी दिलेल्या माहितीमुळे इस्रायली एअर फोर्सला अचूक प्रहार करता आले. इराणचे अनेक अणूशास्त्रज्ञ मारले गेले. इराणचे बॅलेस्टिक मिसाइल कारखाने, सैन्य ठिकाणांवर हल्ले झाले. युद्ध संपल्यानंतर आता मोसादच नेटवर्क मोडून काढण्याच काम इराणने सुरु केलं आहे. मोसादसाठी जे हेरगिरी करत असल्याचा संशय आहे, त्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली आहे.

इस्रायलसाठी हेरगिरी आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरुन इराणमध्ये आज सकाळी तिघांना फासावर लटकवण्यात आलं. इदरीस अली, आजाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल यांनी हत्येसाठी वापरली जाणारी उपकरणं इराणमध्ये आणण्याचा प्रयत्न केला असं इराणच्या हवाल्याने रॉयटर्सने म्हटलं आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध खटला चालवण्यात आला. बुधवारी उरमिया शहरात त्यांना शिक्षा म्हणून फाशी देण्यात आली.

इराणने असं पहिल्यांदा केलेलं नाही

उरमिया इराणच्या उत्तर-पश्चिमेला असलेलं शहर आहे. तुर्कीच्या सीमेजवळ ते आहे. फाशीची पृष्टी करताना इराणी मीडियाने तिन्ही आरोपींचे जेलच्या निळ्या रंगाच्या पोषाखातील फोटो जारी केले. इराणने असं पाऊल उचलण्याची ही पहिली वेळ नाहीय. इराण अनेकदा इस्रायल आणि अन्य गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरुन लोकांना पकडून फाशीची शिक्षा देतो.

आतापर्यंत किती जणांना अटक?

12 दिवसांच्या युद्धादरम्यान इराणने इस्रायलशी संबंध असल्याच्या संशयावरुन 700 लोकांना पकडलं. ही माहिती राज्य समर्थित मीडिया एजेंसी ‘नूर न्यूज’ ने दिली. 13 जूनला इस्रायलविरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर हेरगिरी करणाऱ्यांविरोधात इराणने कठोर कारवाई सुरु केली होती.

इराणने काय म्हटलय?

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या सगळ्यांवर इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादशी संबंधित असल्याचा, सिक्रेट शेअर करण्याचा आणि सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा आरोप आहे. यातील अनेक आरोपींची चौकशी सुरु असल्याच इराणने सांगितलं. काहींना लवकरच शिक्षा सुनावली जाईल. याआधी सुद्धा युद्ध सुरु असताना इराणने आरोप केलेला की, इस्रायलसाठी काही अंतर्गत नेटवर्क काम करत आहे. त्यांना पकडण्यात आलय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.