जगात उडाला हाहाकार! ज्याची भीती तीच धमकी इराणकडून, सर्व संपणार, कोणत्याही क्षणी इराण..

इराण आणि अमेरिका युद्दात होर्मुज खाडीपेक्षाही भयंकर संकट जगापुढे आहे. जर इराणकडून ते पाऊल उचलण्यात आले तर मोठा हाहाकार निर्माण होऊ शकतो. संपूर्ण जग ठप्प होऊ शकते. यादरम्यानच इराणकडून आता थेट धमकीही देण्यात आली.

जगात उडाला हाहाकार! ज्याची भीती तीच धमकी इराणकडून, सर्व संपणार, कोणत्याही क्षणी इराण..
Iran
| Updated on: May 18, 2026 | 9:21 AM

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही युद्ध काही थांबत नाहीये. त्यामध्येच जगाला ज्याची भीती तेच पाऊल उचलण्याच्या तयारीत इराण आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अगोदरच जग ऊर्जेच्या मोठ्या संकटात आहे. होर्मुज खाडीनंतर इराण असे शस्त्र उचलण्याच्या तयारीत आहे, ज्यानंतर जगाच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. संपूर्ण जगाची इंटरनेट सेवा ठप्प होऊ शकते. इराणने काही दिवसांपूर्वीच समुद्राखाली असलेल्या इंटरनेट केबलबद्दल मोठी धमकी दिली आहे. रिपोर्टनुसार, होर्मुज खाडीत मोठ्या प्रमाणात केबल्स आहेत. त्याला निशाणा इराणकडून बनवला जाऊ शकतो. या केबल्सच्या माध्यमातून आशिया, युरोप यांच्यात डेटा ट्रांसफर केला जातो. या केबल्सवर टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत इराण आहे. इराणी रेवल्यूशनरी गार्ड्स मिडिया आणि सैन्य प्रवक्ते इब्राहिम जोलफघारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत धमकी दिली.

त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, आम्ही इंटरनेटवरील केबल्सवर शुल्क आकारणार आहोत. इराणचा स्पष्ट प्लॅन आहे की, मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझान यासारख्या कंपन्यांकडून मोठे शुल्क वसूल करायचे. समुद्रातील या केबल्सच्या दुरूस्ती आणि देखरेखचे काम इराणी कंपन्यांना दिले आहे. इराणचे म्हणणे आहे की, जर टेक कंपन्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर या मार्गातील त्यांची इंटरनेट सेवा ठप्प केली जाईल.

म्हणजे त्या केबल्सवर हल्ला करण्याची धमकी इराणने टेक कंपन्यांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज खाडीत खाली महत्वाच्या केबल्स लाईन आहेत. ज्याने जगाला जोडून ठेवले आहे. जर इराणकडून कोणताही हल्ला या केबल्सवर करण्यात आला तर मोठा हाहाकार उडेल. इंटरनेटसेवा ठप्प होईल.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इराणच्या अटी टेक कंपन्यांना मान्य केल्याशिवाय त्यांच्याकडून कोणताही पर्याय नाही. कारण या केबल्सकरिता दुसरा कोणताही मार्ग नाही. तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, होर्मुज खाडीतून गेलेल्या या केबल्सचा काहीही नुकसान झाले तर इंटरनेट सेवा ठप्प किंवा कमी स्पीडने मिळू शकते. ऑनलाईन बॅकिंग पूर्णपणे ठप्प होईल. ज्याने अरबो डॉलरचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

Follow Us