AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.. भारताचा इराणला मोठा दणका, थेट अणुऊर्जा..

UAE Barakah Nuclear Facility Drone Attack: इराण आणि अमेरिका युद्धात परिस्थिती तणावात आहे. त्यामध्येच इराणकडून अशाप्रकारचे पाऊल उचलण्यात आले, ज्याची जगाला भीती होती. इराणकडून थेट मोठा हल्ला करण्यात आला. आता याचा निषेध भारताकडून व्यक्त करण्यात आला.

हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.. भारताचा इराणला मोठा दणका, थेट अणुऊर्जा..
India and Iran
| Updated on: May 18, 2026 | 8:29 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग एका वेगळ्या संकटात आहे. त्यामध्येच इराणकडून धक्कादायक पाऊल उचलण्यात आले. पश्चिम आशियाई संकट भारताची सर्व बाजूंनी परीक्षा घेत आहे. इराण आणि संयुक्त अरब अमिरात यादरम्यान कट्टर शत्रू बनले आहेत. इराणने पुन्हा एकदा युएईवर मोठा हल्ला केला. या हल्ल्याने थेट मोठा हाहाकार उडाला. मात्र, यादरम्यान भारत संकटात सापडला. इराण आणि युएई दोन्ही देश भारताचे जवळचे मित्र आहेत. आता नक्की पाठिंबा कोणाला द्यायचा हे भारतापुढे मोठे संकट आहे. इराणकडून युएईच्या बरका अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध जवळपास सर्वांनीच केला. भारतानेही इराणची कानउघडणी करत थेट या हल्ल्याचा निषेध केला. भारताने ड्रोन हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

भारताने म्हटले की, संयुक्त अरब अमिरातीच्या बरका अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याबद्दल भारत तीव्र चिंता व्यक्त करतो. अशा घटना अस्वीकार्य आहेत. यातून धोकादायक तणाव वाढण्याचे मोठे संकेत आहेत. आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि संवाद व राजनैतिक मार्गाकडे परतण्याचे आवाहन करतो. भारताने इराणच्या या हल्ल्याचा निषेध केला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत या हल्ल्याचा निषेध केला. इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती अगोदरच तणावपूर्ण आहे. त्यामध्येच इराणकडून अशाप्रकारचा हल्ला करण्यात आल्याने तणाव अधिक वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. युद्ध कमी होण्याऐवजी वाढू शकते. यापूर्वीच इराणकडून या युद्धादरम्यान आखाती देशांवर थेट मोठे हल्ले करण्यात आले. आता पुन्हा हा हल्ला करण्यात आला.

रविवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे बरका अणुऊर्जा प्रकल्पाजवळ आग लागली. त्यानंतर भारताने निवेदन जारी केले.  संयुक्त अरब अमिरातीने या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला असे केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्विकारली नाही. पण युएईकडून या हल्ल्याकरिात इराणला जबाबदार धरण्यात आले. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, आमचा असा विश्वास आहे की, हा ड्रोन हल्ला इराणकडून करण्यात आला.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...