AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनं विकून घेणार घातक शस्त्र! इराण-इस्रायल वादात मोठी घडामोड, नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. त्यामुळे एका देशाने आधी भरपूर सोनं खरेदी केलं. आता हेच सोनं विकून हा देश घातक शस्त्र खरेदी करणार आहे. निर्णय कोणत्या देशाने घेतला चला जाणून घेऊया...

सोनं विकून घेणार घातक शस्त्र! इराण-इस्रायल वादात मोठी घडामोड, नेमकं काय घडलं?
गोल्डImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 06, 2026 | 1:39 PM
Share

इराणविरोधात इस्त्रायल आणि अमेरिका हे दोन देश एकत्र आले आहेत. या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला आहे. गेल्या सात दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल इराणला चांगला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इराण देखील या दोन्ही देशांना चोख उत्तर देताना दिसत आहे. इराणने इतर देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे इतर आखाती देशांमध्ये या युद्धाचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका देशाने काही दिवसांपूर्वी खरेदी केलेले सोने विकून घातक शस्त्र घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असताना. अशातच एक अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार ठरलेला देश पोलंडने आता आपल्या सोन्याच्या साठ्यातील काही भाग विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हे सोने विकून संरक्षण क्षेत्रासाठी निधी उभारण्याची योजना आहे, ज्यामुळे जागतिक सोन्याच्या किमतींवर (Global Gold Prices) मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

१३ अब्ज डॉलरचे सोने विक्रीचे प्रस्ताव

पोलंडच्या राष्ट्रीय बँकेचे (NBP) गव्हर्नर एडम ग्लापिंस्की यांनी राष्ट्राध्यक्ष कारोल नावरॉकी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. पोलंड आपले लष्करी सामर्थ्य दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सुमारे ४८ अब्ज झ्लॉटी (अंदाजे १३ अब्ज डॉलर किंवा १.१ लाख कोटी रुपये) सोन्याच्या विक्रीतून उभारण्याची योजना आहे. याशिवाय इतर मार्गांनी आणखी १२ अब्ज झ्लॉटी उभारून एकूण ६० अब्ज झ्लॉटी (अंदाजे १६ अब्ज डॉलर) पर्यंतचा ‘डिफेन्स फंड’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. पोलंडकडे सध्या सुमारे ५५० टन सोन्याचा साठा आहे, जो जगातील १२व्या क्रमांकाचा आहे. हा साठा विक्री करून नफा कमावला जाईल आणि नंतर सोने पुन्हा खरेदी करून साठा पूर्ववत ठेवला जाईल, अशी रणनीती आहे.

युरोपीय युनियनच्या कर्ज योजनेवर अवलंबून राहणार नाही

पोलंड सध्या युरोपीय युनियनच्या (EU) १५० अब्ज युरो (अंदाजे १७४ अब्ज डॉलर) च्या ‘SAFE’ (Security Action for Europe) शस्त्र खरेदी कर्ज योजनेबाबत चिंतेत आहे. ही योजना महागडी असून, अमेरिकेशी संबंध बिघडू शकतात, असे पोलंडचे मत आहे. त्यामुळे बाह्य कर्जाऐवजी स्वतःच्या सोन्याच्या साठ्याचा वापर करून आधुनिक शस्त्रे, टँक आणि क्षेपणास्त्रे खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. याला ‘Polish SAFE 0%’ असे नाव देण्यात आले आहे, ज्यामुळे व्याजमुक्त निधी उपलब्ध होईल.

दुहेरी फायद्याची रणनीती

गव्हर्नर ग्लापिंस्की यांच्या मते, सोन्याच्या सध्याच्या विक्रमी किमतींचा फायदा घेऊन काही भाग विकणे फायदेशीर ठरेल. यातून मिळालेला नफा संरक्षण खर्चासाठी वापरता येईल. भविष्यात सोन्याचे भाव स्थिर झाल्यावर ते पुन्हा खरेदी करता येईल. तसेच, कायद्यात बदल करून सोन्याच्या साठ्याचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) करूनही निधी उभारता येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...