मोठी बातमी! मित्र राष्ट्रानेच इराणच्या पाठीत खूपसला खंजीर, मोठा धोका, अमेरिकेला थेट निमंत्रण

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे मध्य पूर्वीमधील तणाव चांगलाच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मित्र राष्ट्रानेच इराणच्या पाठीत खूपसला खंजीर, मोठा धोका, अमेरिकेला थेट निमंत्रण
| Updated on: Jun 21, 2025 | 9:51 PM

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे मध्य पूर्वीमधील तणाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे आता इराणचा मित्र राष्ट्र असलेल्या तुर्कीने इराणला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तान प्रमाणेच आता तुर्कीची देखील दुटप्पी भूमिका समोर आली आहे. एकीकडे पाकिस्तानने आम्ही इराणसोबत असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानचे सेनाप्रमुख आसीम मुनीर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत, अशीच काहीशी भूमिका आता तुर्कीची देखील समोर आली आहे.

तुर्कीने मुस्लिम देशांची संघटना असलेल्या (ओआयसी) च्या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे, या शिखर परिषदेमध्ये इराण, इस्रायल युद्ध, आणि पॅलेस्टाईन हे दोन सर्वात मोठे मुद्दे असणार आहेत.परंतु दुसरीकडे तुर्की इस्रायलचा मित्र असलेल्या अमेरिकेसोबत मिळून युद्ध सराव देखील करणार आहे.

याबाबत अमिरेकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याकडून माहिती देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 23 जून ते 4 जुलै दरम्यान तुर्कीमध्ये बहुराष्ट्रीय हवाई दलाच्या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे, या युद्ध सरावात नाटो सहयोगी देशांसोबत अमेरिका देखील सहभागी होणार आहे. इटलीमधील एव्हियानो हवाई तळावर तैनात असलेली अमेरिकेच्या फायटर विंगमधील लढाऊ विमानं या युद्ध अभ्यासामध्ये सहभागी होणार आहेत. मध्य तुर्कीमध्ये असलेल्या केन्या शहरात हा युद्ध सराव होणार आहे.

दरम्यान अमेरिका पहिल्यापासूनच मध्य पूर्वेमध्ये आपलं बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्याची तयारी देखील सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये तुर्कीने जो इराणला आपला मित्र राष्ट्र मानतो त्या देशानं अमेरिकेच्या लढाऊ विमानांना आपल्या भूमीत एन्ट्री देणं हा इराणसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

दरम्यान दुसरीकडे अमेरिकेकडून इराणवर युद्ध विरामासाठी वारंवार दबाव टाकला जात आहे, मात्र अमेरिकेच्या या दबावाला न जुमानता इराणकडून देखील इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामुळे जसं इराणचं नुकसान झालं आहे, तेवढंच इस्त्रायलचं देखील नुकसान झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us