AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ebrahim Raisi Death : कोण आहेत इब्राहिम रईसी?; कसे बनले राष्ट्रपती?

ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन हेलिकॉप्टर रईसी यांच्या ताफ्यात होते. त्यापैकी रईसी यांच्याच हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मागे काही घातपात तर नाही ना? असा संशयही व्यक्त केला जात आहे.

Ebrahim Raisi Death : कोण आहेत इब्राहिम रईसी?; कसे बनले राष्ट्रपती?
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 12:41 PM

ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. त्यात रईसी यांचा मृत्यू झाला आहे. रईसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यापैकी त्यांचंच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रईसी यांचं हेलिकॉप्टर शोधण्यात आलं आहे. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आहे. रईसी यांच्या हेलिकॉप्टरला खरोखरच अपघात झाला की हा घातपात होता? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. इब्राहिम रईसी यांनी अनेक देशांना मदत केली होती. कोण होते रईसी? याचा घेतलेला हा आढावा.

राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना ईराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खुमैनी यांचे उत्तराधिकारी मानलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर मोठा सवाल केला जात आहे. इब्राहिम रईसी यांचा जन्म 1960 रोजी झाला होता. उत्तर पूर्वे ईराणच्या मशहद शहरात त्यांचा जन्म झाला होता. रईसी यांचे वडील मौलवी होते. परंतु, रईसी पाच वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. रईसी यांचा सुरुवातीपासूनचा कल धर्म आणि राजकारणाकडे राहिला होता. विद्यार्थीदशेत असताना मोहम्मद रेजा शाह यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात ते रस्त्यावर उतरले होते. रेजा शाह यांना पश्चिमेकडील देशांचे समर्थक मानले जात होते.

15 व्या वर्षापासून शिक्षण

मशहद शहरात शिया मुसलमानांची सर्वात पवित्र मानली जाणारी मशीद आहे. रईसी अत्यंत कमी वयात उच्च पदावर गेले होते. त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 15 व्या वर्षापासूनच कोम शहरातील एका शिया संस्थेत शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. मोहम्मद रेजा शाह यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. नंतर अयातोल्ला रुहोल्ला खुमैनी यांनी इस्लामिक क्रांती केली होती. 1979 मध्ये ही क्रांती झाली होती. त्यामुळे शाह यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते.

2021मध्ये राष्ट्रपतीपदी

  • वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांना तेहरानमधील कराजचे महाअभियोजक म्हणून नियुक्त केले होते.
  • 1989 पासून ते 1994 पर्यंत रईसी हे तेहरानचे महाअभियोजक होते. त्यानंतर 2004पासून पुढील दशकभर ते न्यायिक प्राधिकरणाचे डिप्टी चीफ होते.
  • 2014 मध्ये ते ईराणचे महाभियोजक बनले होते. ईराणी न्यायपालिकेचेही ते प्रमुख होते. अति कट्टरपंथी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.
  • त्यांना ईराणी कट्टरपंथी नेते आणि देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह अली खुमैनी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
  • 2021 मध्ये उदारवादी हसन रुहानी यांच्या जागी इस्लामिक रिपब्लिक ईराणचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.
  • देशाला भ्रष्टाचार आणि आर्थिक संकटातून मुक्त करणार असल्याचं त्यांनी निवडणूक प्रचारात सांगितलं होतं. तशा पद्धतीने त्यांनी स्वत:ला प्रेझेंट केलं होतं.
  • इब्राहिम रईसी शिया परंपरेच्यानुसार नेमही काळी पगडी वापरायचे. मुहम्मद पैगंबरांचे वशंज असल्याचं ते सांगायचे.
  • त्यांना ‘हुज्जातुलइस्लाम’ म्हणजे ‘इस्लामचा पुरावा’ची धार्मिक पदवी देण्यात आली होती.
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.