जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, इराणने थेट 8..

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. स्थिती गेल्या 24 तासात बिघडली आहे. अमेरिकेकडून इराणच्या 12 लष्कर तळावर हल्ला करण्यात आला. ज्यानंतर इराण पेटून उठला. मोठी हल्ले इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या देशांवर करण्यात आली.

जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, इराणने थेट 8..
US attack Iran
| Updated on: Jun 28, 2026 | 10:00 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील 28 फेब्रुवारी रोजी युद्धाला सुरूवात झाली. हे युद्ध फार काळ चालणार नाही, असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. मात्र, हे युद्ध जवळपास 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ चालले. या युद्धामुळे जग हैराण झाले. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराणवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणकडून पहिल्यांदा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगात कच्च्या तेलाचा तुडवडा निर्माण झाला. कच्च्या तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा झाला. अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती मोठी नाकेबंदी केली. यादरम्यान थेट जहाजांवर अमेरिकेने हल्ले करण्यास सुरूवात केली. भारतीय जहाजांवरही यादरम्यान हल्ले झाले. होर्मुज खाडीत तणाव होता. अखेर इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाले. ज्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

अमेरिकेने इराणच्या तब्बल 12 लष्करी ठिकाणी हल्ला केला, ज्याने तणाव अधिक वाढला. आता इराणकडूनही अमेरिकेच्या या हल्ल्याला जोरदार उत्तर देण्यात आले. इराणकडून खाडी देशांमध्ये हल्ले करण्यास सुरूवात करण्यात आली. ज्यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणाव वाढताना दिसत आहे. युद्ध पेटण्याचे संकेत आहेत. ज्याने जगात एकच खळबळ उडाली.

कुवेत ते बहरीनपर्यंत अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे इराणकडून टाकण्यात आली. ज्या ज्या खाडी देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आले. काही ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचीही माहिती मिळत आहे. इराणकडून अमेरिकेवर मोठा आरोप करण्यात आला. युद्धसंधीचे वारंवार अमेरिकेकडून उल्लंघन केले जात असल्याचे इराणने म्हटले.

यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणला मोठी धमकी दिली. ज्यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे. अमेरिकेने दिलेल्या धमकीनंतरही इराणकडून मोठे हल्ले त्यांच्या तळांवर करण्यात आले. इराणी नौदलाने एका निवेदनात म्हटले की, त्यांच्या नौदल आणि हवाई दलाने रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 2 ते 3 या वेळेत संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळ आणि बहरीनमधील पोर्ट सलमान येथील मुख्यालय यांसह अमेरिकेच्या 8 लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ले करण्यात आली.

Follow Us